For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगावसह राज्याच्या विकासाचे ध्येय

12:26 PM Jun 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
बेळगावसह राज्याच्या विकासाचे ध्येय
Advertisement

खासदार जगदीश शेट्टर : सेकंड व्हिजन कर्नाटक महाप्रदर्शनाचे उद्घाटन

Advertisement

बेळगाव : ज्या वेळी मी देश-विदेशात जात असतो, त्या ठिकाणी बेळगावात काय नवीन आणता येईल किंवा सुरू करता येईल याचाच विचार करत असतो. बेळगावसह राज्याच्या विकासाचे ध्येय ठेवूनच व्हिजन कर्नाटक या महाप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रतिपादन खासदार जगदीश शेट्टर यांनी केले. खासदार जगदीश शेट्टर यांच्या नेतृत्त्वाखाली दिल्ली येथील प्रयास इक्झिबिशनच्यावतीने मंगळवारी केएलई सोसायटीच्या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित केलेल्या सेकंड व्हिजन कर्नाटकच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विधान परिषद सदस्य हणमंत निराणी, माजी खासदार मंगला अंगडी, माजी आमदार संजय पाटील, डॉ. एच. बी. राजेशखर, भाजप ग्रामीण अध्यक्ष सुभाष पाटील, महानगर भाजप अध्यक्षा गीता सुतार, राजेंद्र हरकुणी, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सचे चिफ जनरल मॅनेजर बी. एस. रेड्डी, जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे डायरेक्टर एन. नंदगोपाल, प्रयासचे चेअरमन वनीष गुप्ता, संचालिका मिथू पॉल-गुप्ता आदी उपस्थित होते. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिकांनी भेट दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमिता देसाई तर वनीष गुप्ता यांनी आभार मानले.

Advertisement
Advertisement
Tags :

.