For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महिलांच्या मदतीसाठी 181 हेल्पलाइन; संकटात तातडीने मदत घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

11:18 AM Oct 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
महिलांच्या मदतीसाठी 181 हेल्पलाइन  संकटात तातडीने मदत घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
Advertisement

पणजी : महिला व मुलींना संकटाच्या प्रसंगी मदत मिळावी यासाठी गोवा सरकारची 181 महिला हेल्पलाइन उपलब्ध आहे. छळ, अन्याय किंवा कौटुंबिक त्रासाला सामोरे जाणाऱ्या महिलांनी या क्रमांकावर संपर्क साधून मदत घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

Advertisement

महिला व मुलींनी 181 क्रमांक मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवावा आणि गरज भासल्यास तात्काळ संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले. गोवा सरकारच्या माहितीनुसार 181 महिला हेल्पलाइन ही 24 तास कार्यरत असून गरजेनुसार पोलिस, रुग्णालय, रुग्णवाहिका आणि इतर संबंधित यंत्रणांशी मदत जोडली जाते.

Advertisement

Advertisement
Tags :

.