महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सोशल मीडियावर गोव्याची बदनामी खपवून घेणार नाही

10:09 AM Dec 15, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्याकडून कायदेशीर कारवाईचा इशारा

Advertisement

पणजी : गोवा हे कॅसिनो, वेश्या व्यवसाय व अमलीपदार्थाचे ठिकाण असल्याचे व राज्याविषयी बदनामी करण्याचे पोस्ट तसेच व्हिडियो सोशल मीडियावर टाकण्याचे प्रकार घडत आहेत. काहीजण पैसे उकळण्यासाठी तसेच टीआरपी वाढवण्यासाठी हे कृत्य करीत असल्याचा संशय आहे. परंतु गोव्याची बदनामी करण्यासारखे सोशल मीडियावर जर कुणी प्रकार करत असतील, तर हे खपवून घेतले जाणार नाही. अशा लोकांविऊद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पर्यटन तसेच आयटी खात्याचे मंत्री रोहन खंवटे यांनी दिला आहे. मंत्री खंवटे म्हणाले, गोव्याची बदनामी करणारे पोस्ट व व्हिडियो सोशल मीडियावर वारंवार टाकले जात असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. अशामुळे लोकांच्या भावना दुखावल्या जात आहेत. दलालांवर कारवाई करण्यासाठी पर्यटन खात्याने कोणतीच कसर सोडलेली नाही. 1364 क्रमांकाच्या हेल्पलाईनवर तक्रार आल्यास त्वरित कारवाई केली जाते. आता आक्षेपार्ह व बदनामीकारक पोस्ट व व्हिडियो व्हायरल झाल्यास त्यांच्यावरही फौजदारी कारवाई करण्यात येईल. येत्या आठवडाभरात ‘बीच व्हिजिल अॅप’ जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या अॅपवरही स्थानिक किंवा पर्यटकांना तक्रारी करता येतील. या अॅपवर तक्रार आल्यास पोलिसांमार्फत तात्काळ कारवाई केली जाईल. कारवाईस दिरंगाई झाल्यास संबंधित पोलिसस्थानकाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल,  असे मंत्र्यांनी सांगितले. सोशल मीडियावरील बदनामीच्या प्रकरणात आयटी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येते. हा कायदा केंद्राचा आहे. आम्ही आमच्या सूचना केंद्राला पाठविल्या असून, केंद्राचा हा कायदा गोव्यातही लागू केला जाईल, असे मंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article