टॅक्सी प्रश्न न सुटल्यास गोवा बंद करावा लागेल
टॅक्सी चालकांचा इशारा : दक्षिण गोव्यात टॅक्सी चालकांमध्ये संघर्ष
मडगाव : किनारी भागातील टॅक्सी चालकांकडून हॉटेल्सबाहेर योऊन भाडे घेऊन जाण्याचे प्रकार थांबण्याची गरज असल्याची मागणी केली आहे. काहीजणांकडून हा प्रश्न भडकावण्याचा प्रयत्न होत आहे. राज्य सरकारने योग्य उपाय करत हा प्रश्न सोडवण्याची गरज आहे. प्रसंगी गोवा बंद करण्याची तयारी आहे, असे स्थानिक टॅक्सी चालकांनी सांगितले. दक्षिण गोव्यात टॅक्सी चालकांमधील संघर्ष विकोपाला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केळशी सरपंच डिक्सन वाझ यांच्यासह स्थानिक टॅक्सी चालकांनी गेल्या काही दिवसांपासून सुऊ असलेला टॅक्सी स्टँड व हॉटेल्सवरील व्यवसाय बुडत असल्याचा प्रश्न सोडवण्याची मागणी सरकारकडे केलेली आहे.
डिक्सन वाझ यांनी सांगितले की, पराग रायकर यांनी आपल्या विरोधात पोलिस तक्रार केली त्याची काळजी नाही. आपण त्यांना कोणतीही धमकी दिलेली नाही. आपण स्थानिक टॅक्सी चालकांचा व्यवसाय राखण्यासाठी काम करत आहोत. सरपंच म्हणून गावातील हॉटेल्स, रेस्टॉरंट, शॅक्स यांचे व्यवहार राखण्याची व गावात स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी आहे. सरपंच डिक्सन वाझ यांच्याविरोधात तक्रार झालेली असली तरी टॅक्सीचालक त्यांच्या पाठिशी राहणार. कोणत्याही गाडीला हॉटेल्सच्या गेटसमोर थांण्यास बंदी असतानाही गोवा माईल्सवाले गाड्या उभ्या करतात. हे बंद होण्याची गरज आहे. हॉटेल्सवाल्यांनाही निवेदन सादर केली जातील, असे बाणावलीतील टॅक्सी चालक जेम्स यांनी सांगितले.