For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

पारा स्थिरावला ३४.७ डिग्री सेंटीग्रेडवर ; झाले चंद्र दर्शन, हवेमध्ये जाणवला गारवा

11:23 AM Oct 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
पारा स्थिरावला ३४ ७ डिग्री सेंटीग्रेडवर   झाले चंद्र दर्शन  हवेमध्ये जाणवला गारवा
Advertisement

पणजी: गोव्यात सोमवारी निरभ्र आकाश राहिल्याने कोजागरीचा चंद्र तेजस्वीपणे दिसला. राज्यातील पारा ३४.७ डिग्री सेंटीग्रेडपर्यंत पोहोचल्याने दुपारच्यावेळी उकाडा जाणवला, परंतु रात्री मात्र पारा बराच खाली उतरला आणि हवेमध्ये थोडा गारवा देखील जाणवला.

Advertisement

राज्यात अनेक दिवसानंतर सोमवारी आभाळ निरभ्र राहिले, परिणामी उकाड्याचे प्रमाणही खाली उतरले. हवेतील आद्रतेचे प्रमाणही बरेच खाली आले. त्यामुळे राज्यात कमाल तापमान हे ३४.७ डिग्री सेंटीग्रेडपर्यंत स्थिर राहिले. किमान तापमानामध्ये देखील घट झाली आणि २३. ३ डिग्री सेंटीग्रेडपर्यंत खाली उतरल्याने हवेत थोडा गारवा निर्माण झाला.

पहाटे मात्र मोठ्या प्रमाणात धुके पसरल्याने दहा मीटरवरचे काही दिसत नाही, अशी परिस्थिती होती. दिवसभर वातावरण स्वच्छ राहिले. त्यामुळे गेली काही दिवस निर्माण झालेला उकाडा कमी झाला. दरम्यान आंध्रच्या दरम्यान निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा फटका आंध्र प्रदेश तसेच ओडिशा या दोन राज्यांना बसणार आहे. त्याचबरोबर जोरदार वादळी वाऱ्यासह कर्नाटकामध्ये देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास गोव्यातही पुढील तीन दिवसात काही भागात तुरळक प्रमाणात पाऊस पडू शकतो.

Advertisement

Advertisement
Tags :

.