For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोवा, उत्तराखंड, अरुणाचल विजयी

06:22 AM Apr 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
गोवा  उत्तराखंड  अरुणाचल विजयी
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

हॉकी इंडियाच्या 16 व्या उपकनिष्ठ पुरुषांच्या राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या विविध सामन्यात गोवा, उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेश यांनी प्रतिस्पर्ध्यांवर शानदार विजय मिळविले.

या स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी क गटातील झालेल्या सामन्यात गोवा संघाने राजस्थानचा 7-0 असा पराभव केला. या सामन्यात गोवा संघातर्फे करण कुमारने हॅट्ट्रीक टाकताना दुसऱ्या, 12 व्या आणि 44 व्या मिनिटाला असे 3 गोल केले. साहिल प्रमोदने 17 व्या मिनिटाला, दिलशाद अलीने 27 व्या मिनिटाला, श्रेयस हुंदरेने 30 व्या मिनिटाला तर अंकितने 38 व्या मिनिटाला गोल केले.

Advertisement

ब गटातील दुसऱ्या एका सामन्यात उत्तराखंडने बंगालचा 5-2 असा पराभव केला. उत्तराखंडतर्फे विकीसिंग बोराने तसेच गोविंदसिंगने प्रत्येकी 2 गोल नोंदविले. अमनकुमारने 1 गोल केला. बंगालतर्फे कर्णधार रिजू बार आणि सुझल तुरी यांनी प्रत्येकी 1 गोल केला.

ब गटातील झालेल्या सामन्यात अरुणाचल प्रदेशने बिहारचा 4-2 असा फडशा पाडला. अरुणाचल प्रदेशतर्फे शुभम राजभर, दीपक राव रमनश सिंग, मोहित यादव यांनी प्रत्येकी 1 गोल तर सुमन कुमार आणि कर्णधार अभय शहा यांनी बिहारतर्फे प्रत्येकी 1 गोल नोंदविला.

Advertisement
Tags :

.