नाट्यकलाकार विजेश नार्वेकर यांचे निधन; मेरशी परिसरात हळहळ
10:57 AM Sep 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
पणजी : मेरशी येथील नाट्यकलाकार विजेश विनोद नार्वेकर (43) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने मेरशी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Advertisement
विजेश नार्वेकर हे नाट्य क्षेत्रात सक्रिय होते. अभिनयाच्या माध्यमातून त्यांनी रसिकांमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच नातेवाईक, मित्रपरिवार तसेच नाट्य क्षेत्रातील सहकाऱ्यांनी दुःख व्यक्त केले.
अवघ्या 43 व्या वर्षी त्यांचे निधन झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात कुटुंबीय व आप्तेष्ट असा परिवार आहे.
Advertisement
विजेश नार्वेकर यांच्या पार्थिवावर मेरशी येथील स्मशानभूमीत सायंकाळी 4 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Advertisement