For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

एसटी आरक्षण स्थगितीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; निकालावर एसटी समाजाचे राजकीय भवितव्य अवलंबून

10:23 AM Nov 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
एसटी आरक्षण स्थगितीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान  निकालावर एसटी समाजाचे राजकीय भवितव्य अवलंबून
Advertisement

पणजी: एसटी समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात लोकसंख्या अधिसूचित करण्यासाठी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगिती आदेशाला राज्य सरकारने सक्रिय होत अखेर सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यासाठीची एसएलपी (स्पेशल लिव्ह पिटीशन) याचिका येथे सादर करण्यात आली असून ती दाखल करून घेण्यात आली आहे.

Advertisement

गोव्याचे अ‍ॅडव्होकेट जनरल देवीदास पांगम यांनी ही माहिती दिली आहे. गोव्यातील एसटी राजकीय आरक्षण विषय उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात पोहोचला असून तो आता पूर्णपणे न्यायप्रविष्ट झाला आहे. गोवा विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर म्हणजे तीन ते चार महिन्याच्या अंतरावर असताना सदर विषय न्यायालयात पोहोचला आहे. त्यावर निकाल लागेपर्यंत आता सर्वांनाच गप्प बसण्याशिवाय कोणताही पर्याय राहिलेला नाही. याप्रकरणी काय निकाल लागतो आणि तो लवकर लागतो, का त्यास उशीर होतो, यावरच एसटी समाजाचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला स्थगिती देण्याची मागणी या 'एसएलपी' मधून करण्यात आली आहे.

सदर याचिका गोवा सरकारतर्फे सादर करण्यात आली असून एसटी समाज तसेच केंद्र सरकारतर्फे वेगळी आव्हान याचिका लवकरच दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले. राज्य सरकारने तातडीने गंभीर दखल घेऊन ही याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर केल्याने आता एसटी समाजाचे डोळे याच्या निकालाकडे लागून राहिले आहेत. सदर निकाल भाजपसह राज्य सरकारसाठी महत्त्वाचा ठरणार असून विधानसभा निवडणुकीच्या निकालातून त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

Advertisement

उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती मिळणार : मुख्यमंत्री
उच्च न्यायालयाच्या आदेशास राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. याठिकाणी त्या आदेशाला स्थगिती मिळेल, अशी आशा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वर्तविली आहे.

Advertisement
Tags :

.