गोव्यानेही गोमातेला राज्यमाता घोषित करावे
बद्रिकाश्रम ज्योतिषपीठाधीश शंकराचार्यांचे आवाहन : गो प्रतिष्ठा पदयात्रेचे गोव्यात गोप्रेमींकडून उत्स्फूर्त स्वागत
फोंडा : महाराष्ट्र राज्यात गोमातेला राज्यमाता म्हणून घोषित केले आहे. आता गोवा सरकारनेही हा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. यापुढे गोव्यात जेवढ्या निवडणुका होतील, त्यामध्ये जो पक्ष किंवा जे उमेदवार गाईला राज्यमाता वा राष्ट्रमाता घोषित करण्याचे शपथपूर्वक सांगतील त्यांनाच मतदान करा, असे आवाहन बद्रिकाश्रम ज्योतिषपीठाधीश हिमालय येथील जगद्गुऊ शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती स्वामीजींनी केले. शंकाराचार्यांच्या नेतृत्त्वाखाली सुऊ करण्यात आलेले गो प्रतिष्ठा आंदोलन व त्यानिमित्त विविध राज्यांमध्ये काढण्यात आलेल्या गोध्वज स्थापना भारत यात्रेsनिमित्त कुंडई येथील श्री क्षेत्र तपोभूमिवर काल मंगळवारी झालेल्या गोध्वज स्थापना कार्यक्रमात शंकराचार्य स्वामिजींनी ही घोषणा केली. यावेळी द्वारकापीठाधीश जगद्गुऊ शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती महाराज, तपोभूमी श्री दत्तपद्मनाभ पीठाधीश प. पू. ब्रह्मेशानंद स्वामी तसेच अन्य विविध हिंदू संघटनांचे प्रतिनिधी व मठाचे महंत उपस्थित होते.
ब्रह्मेशानंदाचार्यांनी नेतृत्व करावे
गोभूमी, गोपट्टणम, गोमांचल ही गोव्याची प्राचिन ओळख गोमातेशी निगडीत असून तिला पुन्हा एकदा गोभूमी बनविण्याचा संकल्प समस्त गोमंतकीयांनी करावा. त्यासाठी येथील संत मंहतांनी आपल्या मठ आश्रमातून बाहेर पडत गावोगावी पदयात्रा काढून व्यापक जागृती करण्याचे आवाहन त्यांनी केली. या आंदोलनाचे नेतृत्त्व ब्रह्मेशानंद स्वामिजींनी करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. गाईला राष्ट्रमाता म्हणून घोषित करण्यास अन्य कुठल्याच धर्माचा विरोध असू नये, असे जगद्गुऊ शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती स्वामीजी म्हणाले.
धर्मात गोमातेची पूजा वंदनीय
या पदयात्रेचे प्रयोजन सांगताना द्वारकापीठाधीश जगद्गुऊ शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती म्हणाले, राष्ट्रमाता म्हणून गायीची पशूश्रेणितून मुक्तता करण्यासाठी ही संकल्पयात्रा आहे. देशातील चारही पीठांच्या शंकराचार्यांची या आंदोलनाला संमती आहे. सनातन हिंदू धर्मामध्ये सर्वप्रकारच्या उपासनापद्धतीमध्ये गोमातेची पूजा वंदनीय असून हिंदू असल्याचे हे सर्वात पहिले लक्षण आहे.
धर्म पालनाशिवाय सुखप्राप्ती नाही
धर्म पालनाशिवाय सुखप्राप्ती नाही. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर गेल्या शहात्तर वर्षांमध्ये गायीला राष्ट्रमातेचे स्थान मिळाले नाही. काही मोजक्याच प्रांतामध्ये आत्ताच कुठे हे होत असून संपूर्ण देशातून दबाव वाढला पाहिजे. त्यासाठी समस्त हिंदूना एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही.
गोवंश नष्ट करण्याचे मोठे षडयंत्र
गायीच्या शुद्ध तुपाशिवाय यज्ञ व अन्य धार्मिक विधी होऊ शकणार नाहीत. त्यासाठीच गोवंश नष्ट करण्याचे मोठे षडयंत्र चालले आहेत, ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. शंकराचार्यानी जो संकल्प केला आहे, त्याची पूर्तता झाल्याशिवाय ते मागे हटणार नाहीत. हा त्यांचा मूळ स्वभाव आहे. देशातील प्रत्येक राज्यात ध्वजस्थापना कऊन जागृती केली जात असून त्याची फलनिष्पत्ती निश्चितच होईल, असा विश्वासही द्वारकापीठाधीश जगद्गुऊ शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती यांनी व्यक्त केला. दोन पीठांचे शंकराचार्य एकाच व्यासपीवर येणे हा गोव्यासाठी ऐतिहासिक दिवस असल्याचा उल्लेख ब्रह्मेशानंद स्वामीजींनी केला. विविध संप्रदाय व मठपरंपरांमध्ये विभागलेल्या समस्त हिंदूनी एकत्र येण्याची गरज आहे. सनातन हिंदू धर्म हीच आपली खरी ओळख असून अध्यात्म हे बलस्थान आहे. गोमाता प्रतिष्ठा ही समस्त हिंदू धर्माला एका सुत्रात जोडणारी गोष्ट असून त्यासाठी हिंदू धर्मियांना बहुसंख्य म्हणजे काय हे आपल्या एकतेतून दाखवावे लागेल, असे त्यांनी नमूद केले.
स्वामी गोपालमणी म्हणाले, गाय ही भारतीयांचे गोत्र आहे. गो प्रतिष्ठापना झाल्यानंतर हिंदू राष्ट्र स्थापना होण्यास वेळ लागणार नाही. पर्वरी येथील स्वामी हरिश्रद्धानंद यांनी गोव्यात गाईला राज्यमाता म्हणून मान्यता मिळाल्याशिवाय मठ मंदिरात जाणे व्यर्थ असल्याचे परखड मत मांडले. सर्व मठ मंदिरानी या आंदोलनात सहभागी होऊन गोमाता ही राष्ट्रमाता होईपर्यंत ही चळवळ सुऊ ठेवण्याचे आवाहन केले. गोशाळा व अन्य माध्यमातून गुरांची सेवा व सुश्रुषा करणाऱ्या विविध संस्थांशी निगडीत गोप्रेमींचा यावेळी शंकाराचार्य स्वामीजींच्याहस्ते गौरव करण्यात आला. अयोध्योपासून सुऊ केलेल्या या पदयात्रेची सांगता येत्या 27 रोजी वृंदावनमध्ये होणार आहे. हिंदू जनजागृती समितीचे वैभव आफळे, द्वारकापिठाचे सचिव देवेंद्र पांडे, राजू उपाध्याय यांनीही विचार मांडले. कार्यक्रमाला विविध हिंदू संघटनांचे पदाधिकारी, उद्योजक व अन्य मान्यवर उपस्थित होते.
गोमंतकीय हिंदूंचे भोग संपलेले नाहीत : वेलिंगकर
प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी या व्यासपीठावऊन आपले विचार मांडताना मुक्तीनंतरही गोव्यातील हिंदू धर्मियांचे भोग संपलेले नाहीत, असे विधान केले. पोर्तुगीज राजवटीत इन्क्विझिशनच्या नावाने धर्मन्याय सभा लादून गोमंतकीयांवर धर्मांतरासाठी अनन्वीत अत्याचार झाले. त्याच्या खुणा अद्यापही पुसलेल्या नाहीत. गोव्याची जुनी ओळख पुनर्प्रतिष्ठापित करण्यासाठी सरकारे व राज्यकर्ते असफल ठरले. एका बाजूने गोरक्षण, गोपूजा अशा गोष्टींना प्रोत्साहन देत हिंदूंना भुलवायचे तर दुसरीकडे गोहत्येला मोकळीक देऊन ख्रिस्ती धर्मियांना चुचकारायचे हा सरकारचा दांभिकपणा आहे. मानसिक बदलाचा विकास घडविता आलेला नाही. मतांचे राजकारण व सत्ता टिकवण्यासाठी पवित्र गोमंतभूमिची भोगभूमी करणाचे पाप उघडपणे सुऊ आहे. खुलेआम चालणाऱ्या नाईट पार्ट्या, वेशा व्यावसाय, कॅसिनो यात अडकलेला गोवा खऱ्या अर्थाने मुक्त झालेला नाही. गोमंतकीय हिंदूचे भोग अद्याप संपलेले नाहीत, असे ते म्हणाले.