महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गोमंत साईसेवक समितीतर्फे 4 जाने.पासून गोवा-शिर्डी पदयात्रा

11:54 AM Nov 20, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कुंभारजुवे : गोमंत साई सेवक वारकरी समिती  गोवा आयोजित 7वी गोवा ते शिर्डी पदयात्रा  4 जानेवारी 2024 ते 19 जानेवारी 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. 4 जानेवारी 2024 रोजी दुपारी 2.30 वा श्री राष्ट्रोळी साई मंदिर सांगोल्डा बार्देश येथून साई नामाचा जयघोष करीत ढोल ताशांचा गजरात पालखी संगे पदयात्रेस शुभारंभ  होणार आहे. सुमारे 400 साई भक्त या पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. इच्छुक साईसेवकांना पदयात्रेत सहभागी व्हायचे असेल तर 9765167158 / 8550977158 / 9850930597 या भमणध्वीवर संपर्क साधावा. श्री राष्ट्रोळी साई मंदिर सांगोल्डा बार्देश  येथे गुऊवारी 9 नोव्हेंबर 2023 रोजी पदयात्रा नामफलकाचे अनावरण करण्यात आले.  समितीचे अध्यक्ष सचिन कासकर, सचिव प्रेमानंद कोचरेकर, खजिनदार सोनल नाईक, रोहिदास कोरगावकर, सुशिल मोरजकर व अन्य मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.तरी साईसेवक व भाविकांनी या पदयात्रेत मोठ्या संख्येने सामील होऊन साईंची कृपादृष्टी व स्वर्गसुखाचा आनंद उपभोगावा असे गोमंत साई सेवकचे अध्यक्ष सचिन कासकर यांनी आवाहन केले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article