For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

‘संगीत कधीतरी कोठेतरी’ नाटकाने महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला; सात वैयक्तिक पारितोषिकांचीही कमाई

09:37 PM Nov 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘संगीत कधीतरी कोठेतरी’ नाटकाने महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला  सात वैयक्तिक पारितोषिकांचीही कमाई
Advertisement
पेडणे : महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेच्या 64 व्या महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धा 2025-26 मध्ये गोव्यातील समर्थ थिएटर्स, शिवोली आणि दाडोबा क्रिएशन, मोरजी यांच्या संयुक्त विद्यमाने सादर करण्यात आलेल्या ‘संगीत कधीतरी कोठेतरी’ या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावून गोव्याच्या सांस्कृतिक क्षेत्राचा गौरव वाढवला आहे. महाराष्ट्रातील नामवंत नाट्यसंस्थांच्या सहभागात गोव्यातील नाट्यसंस्थेने सर्वोच्च स्थान मिळवणे ही ऐतिहासिक कामगिरी ठरली आहे.

मुंबईतील यशवंतराव नाट्यमंदिर, माटुंगा येथे सोमवारी आयोजित राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभात सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या हस्ते विजेत्या नाटकाच्या प्रतिनिधींनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक स्वीकारले.

Advertisement

या नाटकाने सांघिक प्रथम पारितोषिकासह एकूण सात वैयक्तिक पारितोषिके प्राप्त केली आहेत. त्यामुळे गोव्यातील रंगभूमीच्या गुणवत्तेची आणि संगीत नाटकाच्या समृद्ध परंपरेची महाराष्ट्राच्या प्रतिष्ठित स्पर्धेत प्रभावीपणे नोंद झाली आहे.

महाराष्ट्रातील दिग्गज नाट्यसंस्थांशी स्पर्धा करत गोव्यातील संस्थांनी मिळवलेले हे यश राज्यातील कलाकार, नाट्यप्रेमी आणि सांस्कृतिक क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरले आहे. ‘संगीत कधीतरी कोठेतरी’ या नाटकाच्या यशामुळे गोव्याच्या रंगभूमीला राज्यस्तरीय व्यासपीठावर नवी ओळख मिळाली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.