For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राष्ट्रीय आजारपण नोंदीत गोवा चौथ्या स्थानी

05:04 PM May 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
राष्ट्रीय आजारपण नोंदीत गोवा चौथ्या स्थानी
Advertisement

राष्ट्रीय आरोग्य अहवालातून स्पष्ट : आरोग्यसेवेवरील खर्च कमी ठेवण्यात यश

Advertisement

पणजी : राज्यात आजारपणाच्या बाबतीत 15 दिवसांच्या कालावधीत 18.7 टक्के लोकसंख्या आजारी असल्याचे दिसून आले असून राष्ट्रीय स्तरावर हा दर चौथा सर्वाधिक आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या आरोग्य अहवालातून ही बाब समोर आली आहे. राष्ट्रीय सरासरी 13.1 टक्के असून त्या तुलनेत गोव्यातील टक्केवारी लक्षणीयरित्या जास्त आहे. आतापर्यंत केरळ, पश्चिम बंगाल व आंध्रप्रदेश या केवळ तीनच राज्यांनी तो ओलांडला आहे. वर्ष 2025 च्या जानेवारी ते डिसेंबर दरम्यान नोंद असलेल्या माहितीवर आधारित हा अहवाल आहे. त्यानुसार गोव्यातील आजारी म्हणून प्रतिसाद देणाऱ्या व्यक्तींचे उच्च प्रमाण हे राज्यातील आरोग्यविषयक समस्यांच्या तुलनेने जास्त नोंद झाले आहे.

आजारपणाचे हे प्रमाण जास्त असले तरीही गोव्याने आरोग्यसेवेवरील खर्च मात्र कमी ठेवण्यात यश मिळवले आहे. राज्यात रुग्णालयात दाखल होण्याचा सरासरी खर्च रु. 25,726 आहे, तर राष्ट्रीय सरासरी रु. 37,858 एवढी आहे. गोव्यात 64.7 टक्के लोक सरकारी सुविधांची निवड करतात, तर राष्ट्रीय सरासरी 36.7 टक्के आहे.  सरकारी रुग्णालयांमधील उपचार परवडणारे असले तरी तेथील वास्तव्याचा सरासरी खर्च रु. 1,639 आहे. याउलट खाजगी सुविधांमधील खर्च जास्त असून तो सरासरी रु. 69,777 एवढा आहे. यावरून रुग्णाकडून होणाऱ्या वैद्यकीय खर्चातील तफावतींवरही या अहवालातून प्रकाश टाकला आहे.  प्रसूती सेवेमध्येही सरकारी व खाजगी रुग्णालयांमधील खर्चातील मोठी तफावत आहे. सरकारी ऊग्णालयात प्रसूतीसाठी सरासरी रु. 1,010 खर्च येतो, तर खाजगी रुग्णालयांमध्ये तोच खर्च रु. 44,410 आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.