For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

 गोव्यात आजपासून तीन दिवस यलो अलर्ट

10:23 AM Sep 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
 गोव्यात आजपासून तीन दिवस यलो अलर्ट
Advertisement

पणजी : हवामान खात्याने सोमवारी गोव्यासाठी यलो अलर्ट जारी केला होता. मात्र, प्रत्यक्षात राज्यात पावसाने पुन्हा दडी मारल्याचे चित्र पाहायला मिळाले. काही भागांत तुरळक सरी वगळता सोमवारी कडक ऊन पडले आणि उकाड्यातही मोठी वाढ झाली. आता मंगळवारपासून पुढील तीन दिवस राज्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला असून या कालावधीत जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

Advertisement

गेल्या 24 तासांत राज्यात अत्यंत तुरळक पावसाची नोंद झाली. फोंडा, काणकोण, धारबांदोडा, मडगाव, मुरगाव आणि दाबोळी परिसरात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. मात्र, त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने अनेक भागांत उन्हाचा कडाका जाणवला.

सोमवारसाठी जारी करण्यात आलेला यलो अलर्ट पावसाअभावी रद्द करण्यात आला. त्यानंतर हवामान खात्याने मंगळवारपासून पुन्हा यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील दोन दिवसही राज्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement

दरम्यान, सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत यंदाच्या मोसमातील तुलनेने कमी पावसाची नोंद झाली आहे. गोव्यात आतापर्यंत सुमारे 78 इंच पाऊस झाला असून तो वार्षिक सरासरीपेक्षा 32 टक्क्यांनी कमी आहे. अधिकृत पावसाळी मोसम संपण्यास आता केवळ सात दिवस शिल्लक असल्याने आगामी काळातील पावसाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Tags :

.