For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

राज्यात आज-उद्या पावसाची शक्यता; यलो अलर्ट जारी, हवेत गारवा आल्याने नागरिकांना दिलासा

12:20 PM Nov 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
राज्यात आज उद्या पावसाची शक्यता  यलो अलर्ट जारी  हवेत गारवा आल्याने नागरिकांना दिलासा
Advertisement

पणजी: गोव्यावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात बहुतांश भागात सोमवारी जोरदार वृष्टी झाली. आज आणि उद्या दोन दिवस हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केले असून यादरम्यान गोव्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविला आहे. रविवारी राज्यात उकाडा प्रचंड वाढला होता. त्यानंतर सायंकाळच्या दरम्यान बहुतांश भागात जोरदार पाऊस पडला. पणजी, पेडणे, म्हापसा, डिचोली, फोंडा, सांगे इत्यादी भागात बराच मोठ्या प्रमाणात पाऊस पडला.

Advertisement

जुने गोवे येथे देखील बऱ्यापैकी पाऊस पडला. सोमवारी हवामान खात्याने दुपारी तीन दिवसांकरिता यलो अलर्ट जारी केला. त्यानुसार सोमवार, मंगळवार आणि बुधवार असे तीन दिवस गोव्यात सर्वत्र मेघगर्जनेसह जोरदार पाऊस त्याचबरोबर जोरदार वारे वाहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. सोमवारी दुपारनंतर सत्तरी, सांखळी इत्यादी भागात जोरदार पाऊस झाला आणि अवघ्या अर्ध्या तासामध्ये पणजी, म्हापसा, फोंडा, मडगाव, काणकोण, पेडणे इत्यादी भागात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडला, बंगालच्या खाडीमध्ये आणखी एक चक्रीवादळ निर्माण झाले असून ते आज आंध्रप्रदेशमध्ये पोहोचत आहे. तिथून वादळाने जर दिशा बदलली तर तेलंगणा, कर्नाटक आणि गोव्यातही मध्यम प्रमाणात पाऊस पडू शकतो. सोमवारी पडलेल्या या पावसामुळे मात्र हवेत गारवा आला आणि जनतेला दिलासाही मिळाला.

Advertisement
Advertisement
Tags :

.