महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पर्यटन प्रदर्शनात गोवा ‘नंबर 1’

11:40 AM Jul 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कोलकाता येथील प्रदर्शनात सर्वोत्कृष्ट दालन सजावटीचा पटकावला पुरस्कार 

Advertisement

पणजी : पर्यटन क्षेत्रातील महत्त्वाचा पर्यटन प्रदर्शन पुरस्कार गोवा राज्याने पटकावत ‘नंबर 1’ कामगिरी केली. सर्वोत्कृष्ट दालन सजावटीबद्दल गोव्याने हा पुरस्कार पटकावला. देशपातळीवर घेण्यात आलेल्या पर्यटन प्रदर्शनाचा मेळा 12 ते 14 जुलै या दरम्यान कोलकाता येथील बिस्वा बांगला प्रांगणात घेण्यात आला. पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले की, ‘पर्यटन प्रदर्शन मेळावा कोलकाता 2024’ने केवळ गोव्याची पर्यटन क्षमता दाखविण्याचीच नाही तर पश्चिम बंगालमधील व्यापारी सदस्यांशी आणि बाकीच्यांना सहभागी होण्याची एक उल्लेखनीय संधी उपलब्ध करून दिली आहे. देशाच्या शाश्वत पर्यटनावर माहिती आणि कल्पनांची देवाणघेवाण अमूल्य आहे. या परस्परसंवादांनी आम्हाला नवनवीन शोध घेण्यासाठी आणि उद्योगतज्ञांशी अधिक जवळून सहकार्य करण्यासाठी प्रेरणा दिली आहे जेणेकरून गोव्याचे प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून आकर्षण वाढेल. गोव्याने सर्वोत्कृष्ट दालन सजावटीबद्दल मिळवलेला पुरस्कार हा गोव्याच्या शिरपेचात रोवलेला आणखी एक तुरा आहे, असेही मंत्री खंवटे म्हणाले.

Advertisement

गोवा पर्यटन विकास महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक (विपणन) दीपक नार्वेकर, गोवा पर्यटन विभागाचे माहिती सहाय्यक सुदत्त कांबळी यांच्या नेतृत्वाखाली कोलकाता येथील पर्यटन प्रदर्शन मेळाव्यात गोवा पर्यटन विभाग सहभागी झाला होता. पश्चिम बंगाल आणि आसपासच्या राज्यांतील प्रवाशांना गोव्यातील अद्वितीय आणि वैविध्यपूर्ण पर्यटनाची माहिती या दालनाद्वारे झाली. गोवा पर्यटन विभागाच्या दालनास ‘ट्रॅव्हल अँड टुरिझम फेअर कोलकाता 2024’ मध्ये ‘लार्ज पॅव्हेलियन’ श्रेणीतील सर्वोत्कृष्ट सजावट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

गोवा पर्यटन विभागाचे संचालक सुनील अंचिपाका (आयएएस) म्हणाले, “टीटीएफ कोलकाता येथे पर्यटन विभागाचा सहभाग हा आमच्यासाठी एक महत्त्वाचा क्षण आहे. उद्योगजगतातील उद्योजक आणि ट्रेड अभ्यागतांसोबत गुंतल्याने विकसित होत असलेल्या पर्यटनाची समज समृद्ध झाली आहे. इतर राज्यांतील पर्यटन अधिक्रायांसह विकसित केलेल्या विविध आघाड्यांमुळे गोव्यातील आमच्या अभ्यागतांच्या आणि स्थानिक समुदायाच्या फायद्यासाठी सर्वोत्तम पर्यटन ऑफर देण्यावर लक्ष केंद्रित करणारे राज्य म्हणून गोव्याची स्थिती आणखी मजबूत झाली आहे. गोवा पर्यटन विभागाचे प्रतिनिधीं विविध उद्योगातील नेते, व्यापार अभ्यागत आणि विविध राज्यांतील सहकारी उपस्थितांना भेटले, मौल्यवान कनेक्शन वाढवले आणि शाश्वत पर्यटनाला चालना देण्यासाठी माहितीची देवाणघेवाण केली. या कार्यक्रमामुळे गोव्याच्या पर्यटनाची क्षमता वाढविण्यावर अर्थपूर्ण चर्चा करण्यात आली आणि शाश्वत आणि पुनर्संचयित पर्यटन पद्धतींबाबत राज्याच्या वचनबद्धतेवर भर देण्यात आला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article