Goa News नवीन सत्र सुरु आणि गोव्यात शिक्षकांची पदे रिक्त, कंत्राटी पदांमुळे शाळांमध्ये चिंतेचे वातावरण
जून महिना सुरु झाला शाळा आणि नवीन सत्राचे वेध विद्यार्थी शिक्षकांना लागतात मात्र गोव्यात सध्या शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे शाळांमध्ये चिंताग्रस्त वातावरण निर्माण झाले आहे.
गोव्यातील काही शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षक मिळत आहेत. शिक्षक सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांच्या जागी कायमस्वरूपी शिक्षक मिळत नाहीत .शाळांसाठी ही एक अत्यंत चिंतेची बाब असून, कधीकधी चार ते आठ शिक्षकांची कमतरता भासते. अशा परिस्थितीत शाळा पुढे जाऊ शकत नाही.”
नवहिंद टाईम्सने दिलेल्या एका वृत्तानुसार मडगाव येथील एका शाळेच्या व्यवस्थापकाने निदर्शनास आणून दिले की, सरकारने अधिक शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू केली असली तरी, ती यापूर्वीच सुरू व्हायला हवी होती. “आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, सरकारने अधिक शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे, परंतु अनुदानित शाळांसाठी ती या महिन्यात सुरू होईल. त्यानंतर कंत्राटी शिक्षकांचा मुद्दा आहे. असे शिक्षक आहेत जे सहा ते आठ वर्षांपेक्षा जास्त काळ काम करत आहेत, परंतु तरीही कंत्राटी आहेत. अशा शिक्षकांना कायम केले पाहिजे.
६ जूनला शाळा होणार सुरु
शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी मंगळवारी सांगितले की, राज्यभरातील शाळा वेळापत्रकानुसार ६ जून रोजी पुन्हा सुरू होतील."उष्णतेची लाट किंवा उशिरा आलेल्या मान्सूनमुळे शाळा पुन्हा सुरू होण्यास कोणताही विलंब होणार नाही," असेही ते म्हणाले.
झिंगडे यांना अशीही माहिती देण्यात आली की, विभागाने रेनकोट आणि गणवेश खरेदीसाठी विद्यार्थ्यांच्या खात्यात निधी हस्तांतरित करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी पुढे सांगितले की, नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी शाळेच्या मोठ्या नूतनीकरणाची कामे पूर्ण झाली आहेत.
शिक्षण संचालक म्हणाले
मान्सूनला उशीर होण्याच्या परिस्थितीबद्दल विचारले असता, शिक्षण संचालकांनी सांगितले की, अशा परिस्थितीत शाळा लवकर बंद करण्याची परवानगी देण्याचा पर्याय शिक्षण विभागाकडे आहे आणि आवश्यक असल्यास योग्य तो निर्णय घेतला जाईल.
शिक्षकांच्या उपलब्धतेवर बोलताना झिंगडे म्हणाले की, सरकारी शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता नाही, मात्र सध्या अनेक शिक्षकांची नियुक्ती कंत्राटी किंवा व्याख्यान तत्त्वावर करण्यात आली आहे. शिक्षकांच्या नियमित नेमणुका करण्याची प्रक्रिया आधीच सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.