महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

गोवा माईल्सला स्थानिकांनी स्वीकारले

12:33 PM Jul 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मंत्री गुदिन्हो यांची माहिती : मोपवरील काऊंटर बंदीची मागणी धुडकावली,माईल्सकडून मिळाले 8.5 कोटी

Advertisement

पणजी : गोवा माईल्सच्या 1,500 टॅक्सींनी गत सहा वर्षांत सरकारला 8.05 कोटी ऊपये महसूल दिला आहे. तर स्थानिकांच्या 18 हजार टॅक्सींमुळे आतापर्यंत सुमारे 500 कोटी महसूल बुडाला आहे, असा दावा वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी केला. एवढेच नव्हे तर ही सेवा किफायतशीर असल्यामुळे आतापर्यंत 55 लाख प्रवाशांनी तिचा लाभ घेतला आहे. यापैकी 50 टक्के प्रवासी हे स्थानिक आहेत. आजही दररोज किमान 1,200 प्रवासी गोवा माईल्सचा लाभ घेतात, अशी माहिती देत गुदिन्हो यांनी गोवा माईल्सचे जोरदार समर्थन केले. यावरून ही सेवा स्थानिकांनी स्वीकारली असल्याचे सिद्ध होते, असेही ते म्हणाले. गुऊवारी विधानसभेत प्रश्नोत्तर तासाला मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर कार्यरत गोवा माईल्स टॅक्सी सेवेच्या मुद्द्यावरून जोरदार चर्चा झाली. पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी हा प्रश्न उपस्थित करताना मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील गोवा माईल्सचे काऊंटर बंद करण्यात यावे, अशी जोरदार मागणी केली. या सेवेमुळे स्थानिक पर्यटक टॅक्सी मालकांना धंदा मिळत नसल्याचा दावा त्यांनी केला.

Advertisement

माईल्सचे काऊंटरच बंद करावे : आर्लेकर

गोवा माईल्स बुकिंगद्वारे तसेच ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतींने ग्राहक मिळवते. या अॅप आधारित टॅक्सी सेवेत बहुतांशी परप्रांतीय आहेत. त्याचा फटका स्थानिक टॅक्सी मालकांना बसतो. त्यामुळे गोवा माईल्सचे काऊंटरच बंद करण्यात यावे, अशी मागणी पेडणेचे आमदार आर्लेकर यांनी केली. मात्र मंत्री गुदिन्हो यांनी आर्लेकर यांची मागणी धुडकावून लावली. एवढेच नव्हे तर गोवा माईल्सची राज्याला कशाप्रकारे गरज आहे ते स्पष्ट करताना या सेवेचा इतिहासच सभागृहात मांडला.

माईल्सकडे 1500 टॅक्सी, स्थानिकांना प्राधान्य : गुदिन्हो

2018 पासून सदर सेवा राज्यात सुरू झाली. या सेवेत सहभागी टॅक्सींमधील 90 टक्के टॅक्सी स्वत: मालक चालवतात व उर्वरित टॅक्सींवर चालक नियुक्त करण्यात आले आहेत. गोवा माईल्सकडे सध्या सुमारे 1,500 टॅक्सी असून त्यात स्थानिकांनाच सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे. त्याशिवाय गत सहा वर्षांत त्यांनी जीएसटी आणि टीडीएस मिळून तब्बल 8.05 कोटी महसूल सरकारजमा केलेला आहे, असे गुदिन्हो यांनी सांगितले.

स्थानिक टॅक्सीमुळे 500 कोटी महसूल बुडाला

याउलट राज्यात स्थानिकांच्या सुमारे 18 हजार टॅक्सी आहेत. त्यांचे मालक अजूनही अॅपसेवेत सहभागी होत नाहीत. त्यावर उपाय म्हणून त्यांनी स्वत:चे अॅप सुरू करावे, असे सरकारकडून सूचविण्यात आले. परंतु त्यांना तेही मान्य नाही. या खासगी टॅक्सीमुळे सरकारचा सुमारे 500 कोटी महसूल बुडाला आहे, अशी माहिती गुदिन्हो यांनी दिली. राज्य सरकारने गोवा माईल्सच्या माध्यमातून ‘मुख्यमंत्री गोंयचो टॅक्सी पात्रांव’  योजना सुरू केली आहे. राज्यभरातील अनेक युवकांना तिचा लाभ झाला असल्याचेही गुदिन्हो यांनी नमूद केले.

बहुतांश विमानतळे, रेल्वे स्थानकांवर अॅप आधारित टॅक्सी

पुढे बोलताना गुदिन्हो यांनी देशातील बहुतांश विमानतळांवर अॅप आधारित टॅक्सी सेवा कार्यरत आहे. तसेच असंख्य रेल्वे स्थानकांवरही अशी सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. अशावेळी गोवाच का अपवाद राहावा, असा सवालही त्यांनी उपस्थित केला व आर्लेकर यांची मागणी अमान्य केली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article