For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अनमोड अबकारी चेक नाक्यावर गोवा बनावटीचा दारूसाठा जप्त

10:07 AM Mar 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
अनमोड अबकारी चेक नाक्यावर गोवा बनावटीचा दारूसाठा जप्त
Advertisement

 वार्ताहर /रामनगर

Advertisement

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात सर्वत्र आचारसंहिता लागू करण्यात आल्याने प्रत्येक ठिकाणी ये-जा करणाऱ्या वाहनांवर कडक नजर ठेवण्यात येत आहे. गोवा येथून कर्नाटकमध्ये अनमोड घाटातून आयशर वाहनातून गोवा बनावटीची दारू शुक्रवारी जप्त करण्यात आली. गोवा येथून हुबळीच्या दिशेने जाणाऱ्या आयशर क्र. केए 25 एए 3980 या वाहनाची कसून तपासणी केली असता यामध्ये गोवा बनावटीची 14.750 लिटर दारू पकडण्यात आली. त्यामुळे सदर दारू वाहतूक प्रकरणी बिन हजारे साफ नदाफ तसेच नदाफ मिश्र कोटी रा. कलघटगी याला ताब्यात घेण्यात आले.

8 लाख 5000 चा ऐवज हस्तगत

Advertisement

सदर संशयितांकडून यावेळी वाहनासह 8 लाख 5000 रु.चा ऐवज अनमोड अबकारी निरीक्षक सुनील कुमार, तसेच उपनिरीक्षक शिवशंकर विक्रम बिडकर, बसवराज ग•णावर, रामनगर पोलीस स्थानकाचे दयानंद मिराशी तसेच राजू राठोड यांनी कारवाई करून जप्त केला.

Advertisement
Tags :

.