For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Excise Action चंदगडमध्ये गोवा बनावट मद्यासह टेम्पो जप्त राज्य उत्पादन शुल्काची कारवाई, टेम्पोसह २१.६१ लाखांचा मुद्देमाल जप्त

02:34 PM Jun 21, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
kolhapur excise action चंदगडमध्ये गोवा बनावट मद्यासह टेम्पो जप्त राज्य उत्पादन शुल्काची कारवाई  टेम्पोसह २१ ६१ लाखांचा मुद्देमाल जप्त
Advertisement

| प्रतिनिधी, कोल्हापूर

Advertisement

गोवा बनावट विदेशी मद्याची बेकायदेशीर विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करणाऱ्या एका सहाचाकी टेम्पोवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या शिनोळी सीमा तपासणी नाक्याच्या पथकाने धडक कारवाई केली. चंदगड तालुक्यातील हेरे गावच्या हद्दीत पारगड-हेरे रस्त्यावरील माळरानावर करण्यात आलेल्या या कारवाईत मद्यसाठा आणि वाहनासह एकूण २१ लाख ६१ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी वाहनचालक शैलेश कृष्णा भातकांडे याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या शिनोळी कार्यालयाला मिळालेल्या बातमीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने हेरे गावच्या हद्दीत, पारगड-हेरेच्या माळरानावर सापळा रचला होता. यावेळी संशयास्पद आढळलेल्या टेम्पोची झडती घेण्यात आली. या झडती दरम्यान वाहनामध्ये गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे विविध ब्रँडचे एकूण १७७ बॉक्स मिळून आले.

Advertisement

या कारवाईमध्ये पथकाने ११ लाख ६१ हजार १२० रुपये किमतीचे गोवा बनावट विदेशी मद्य आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला १० लाख रुपये किमतीचा सहाचाकी टेम्पो असा एकूण २१ लाख ६१ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाई कोल्हापूर अधीक्षक स्नेहलता नरवणे आणि उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये शिनोळी नाक्याचे निरीक्षक पी. आर. खरात, दुय्यम निरीक्षक डी. एम. बायदंडे, जी. एल. राणे तसेच जवान भरत सावंत, संदीप चौगुले, राहुल शिंदे, तुषार पवार, किरण बागुल आणि महिला जवान स्वप्नाली बेडगे यांनी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक जी. एल. राणे करीत आहेत.

Advertisement
Tags :

.