महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गोवा मुक्तीदिनानिमित्त कुठ्ठाळी येथील सरकारी शाळेत वेशभूषा स्पर्धा

12:43 PM Dec 20, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वास्को : कुठ्ठाळी येथील जगन्नाथ शेट कला संस्थेतर्फे गोवा मुक्तीदिनानिमित्त सत्रांत कुठ्ठाळी येथील सरकारी प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पूर्व प्राथमिक्र गटात इंद्रजीत, प्रियांशु व चनाशा यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षीस प्राप्त झाले. प्राथमिक गटा कु. परी, श्रेया, दिपीका, साहील, कांसराम यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ बक्षीसे प्राप्त झाली. पूर्व माध्यमिक गटात सुगंधा कुमारी, रविना कुमारी, साक्षी चलवादी, संधना कुमारी, करण यादव, वैशाली, सलोनी यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ बक्षिसे मिळाली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुनील शेट व सुनयना शेट यांनी गोवा मुक्तिदिनाचे महत्व सांगितले. शाळेच्या मुख्याध्यापिका परपेच्युअल फर्नांडिस यांनी स्वागत करून आयोजनाचा हेतू विशद केला. यावेळी अनिता कोचरेकर, हेमा साळगांवकर, गीता पवार बोरकर, अंकिता नेरूलकर, अपूर्वा महाबळ व विश्वरूप नाईक उपस्थित होते. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्याहस्ते बक्षिसे व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article