For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आरोग्याबाबत गोवा इतर राज्यांसमोर रोल मॉडेल!

11:46 AM Mar 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
आरोग्याबाबत गोवा इतर राज्यांसमोर रोल मॉडेल
Advertisement

आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे प्रतिपादन : ‘सीएसआर’च्या आठ ऊग्णवाहिकांचे लोकार्पण

Advertisement

पणजी : आरोग्य क्षेत्रामध्ये गोवा हे इतर राज्यांसमोरील ‘रोल मॉडेल’ आहे. राज्याच्या आरोग्य क्षेत्रात यापुढेही दर्जेदार साधनसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. गोव्यातील जनतेला उपचारांसाठी इतर राज्यांमध्ये जावे लागू नये यासाठीच आपले प्रयत्न सुरू आहेत, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले. पॉवरग्रीड महामंडळाने सीएसआर फंडातून आरोग्य खात्याला आठ ऊग्णवाहिका दिल्या आहेत. या ऊग्णवाहिकांच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आरोग्य संचालिका डॉ. गीता काकोडकर व पॉवरग्रीड महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

सीएसआरमधून रुग्णवाहिका

Advertisement

राज्याच्या आरोग्य क्षेत्रात ऊग्णवाहिकांची संख्या कमी होती. काही दिवसांपूर्वी एका कंपनीने सीएसआर फंडातून राज्याला चार ऊग्णवाहिका दिल्या. त्यानंतर आता पॉवरग्रीड महामंडळाने आठ ऊग्णवाहिका दिल्या आहेत. त्याचा लाभ निश्चित गोमंतकीय जनतेला मिळणार आहे, असे मंत्री राणे म्हणाले.

अजून रुग्णवाहिकांची गरज

कठीण प्रसंगी तत्काळ दाखल होऊन ऊग्णांचे जीव वाचवण्याचे काम ऊग्णवाहिका करीत असतात. अजूनही आरोग्य खात्याला ऊग्णवाहिकांची आवश्यकता आहे. यापुढील काळात आवश्यक तितक्या ऊग्णवाहिका आरोग्य खात्याला देण्यात येतील. पॉवरग्रीड महामंडळाने दिलेल्या ऊग्णवाहिका 108 च्या ताब्यात देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

कॅन्सरवरील उपचार गोव्यात

यापूर्वी कॅन्सरसारख्या विविध आजारांच्या उपचारांसाठी गोव्यातील नागरिकांना इतर राज्यांमध्ये जावे लागत होते. त्यामुळे राज्यातच अशा आजारांवरील उपचार मिळावे, यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले होते. त्या प्रयत्नांना यश मिळाले असून, गोमंतकीयांना अनेक आजारांवरील उपचार सध्या गोव्यातच मिळत आहेत. त्याचा मोठा फायदा त्यांना मिळत आहे. पुढील काळात ब्रेस्ट कॅन्सरवरील उपचारही गोव्यातच मिळणार आहेत, असे ते म्हणाले. गोमंतकीय जनतेला गोव्यात मोफत उपचार मिळत असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या घटकांना दिलासा मिळाला आहे, असेही आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी नमूद केले.

Advertisement
Tags :

.