For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोव्यात इन्फ्लूएंझा रुग्णसंख्येत वाढ; आरोग्य विभागाकडून सतर्कतेचा इशारा

01:32 PM Aug 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
गोव्यात इन्फ्लूएंझा रुग्णसंख्येत वाढ  आरोग्य विभागाकडून सतर्कतेचा इशारा
Advertisement

मडगाव : मान्सूनच्या काळात श्वसनविकारांचा प्रादुर्भाव वाढण्याच्या हंगामी स्वरूपानुसार, गोव्यात अलीकडच्या आठवड्यांत इन्फ्लूएंझाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवा संचालनालयाने एक आरोग्यविषयक सूचना जारी केली आहे.
निरीक्षण आकडेवारीनुसार, इन्फ्लूएंझा-पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जूनमधील 6 वरून वाढून जुलैमध्ये44 आणि 20 ऑगस्ट 2026  पर्यंत 73 झाली आहे. नियमित इन्फ्लूएंझा देखरेखीचा भाग म्हणून या वाढीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे संचालनालयाने म्हटले आहे.

Advertisement

तसेच, वारंवार साबण आणि पाण्याने हात धुवावेत किंवा अल्कोहोल-युक्त हँड सॅनिटायझरचा वापर करावा, असा सल्लाही आरोग्य खात्याने दिला आहे. न धुतलेल्या हातांनी डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळावे. ताप, खोकला, घसा खवखवणे किंवा श्वसनविकाराची इतर लक्षणे असलेल्यांनी इतरांशी संपर्क मर्यादित ठेवावा.
लक्षणे गंभीर असल्यास, दीर्घकाळ टिकून राहिल्यास किंवा अधिक तीव्र होत असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा. विशेषतः लहान मुले, वृद्ध व्यक्ती, गर्भवती महिला आणि आधीच काही आजार असलेल्या व्यक्तींनी याकडे विशेष लक्ष द्यावे. तपासणी आणि उपचारांबाबत वैद्यकीय सल्ला पाळावा आणि स्वतःहून औषधे घेणे टाळावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
इन्फ्लूएंझाच्या वाढत्या प्रादुर्भावावर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे सांगत, आरोग्य खात्याने जनतेला घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आणि श्वसनविकारांचा प्रसार रोखण्यासाठी सुचवलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.