For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

देशात सर्वाधिक बेकारी गोव्यात

04:08 PM Apr 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
देशात सर्वाधिक बेकारी गोव्यात
Advertisement

केंद्राच्या लेबर फोर्स सर्वेक्षणात नोंद

Advertisement

पणजी : केंद्र सरकारच्या सांख्यिकी मंत्रालयातर्फे जारी करण्यात आलेल्या लेबर फोर्स सर्वेक्षण अहवालातून 2025 या वर्षात गोवा राज्यातील बेकारीचा दर देशात सर्वाधिक म्हणजे 8.3 टक्के असल्याची नोंद करण्यात आली आहे. हा बेकारीचा दर राष्ट्रीय सरासरी 3.1 टक्क्यांपेक्षा बराच वर असल्याचे त्यात म्हटले आहे. अहवालातील माहितीनुसार, गोव्याच्या ग्रामीण भागातील बेकारी दर 11.9 टक्के तर शहरी भागातील बेकारी दर 6.1 टक्के आहे. ग्रामीण भागात पुरुष बेकारी दर 12.1 टक्के तर महिला बेकारी दर 11.4 टक्के आहे. शहरी भागात हाच बेकारी दर अनुक्रमे 6.6 टक्के तर 4.8 टक्के एवढा आहे. या अहवालामुळे लहान असलेल्या गोवा राज्यात बेकारी मोठ्या प्रमाणावर असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

नोंदणी रद्द न केल्याने बेकारीचा दर फुगलेला

Advertisement

खासगी आणि इतर बिनसरकारी क्षेत्रात अनेकजण नोकरी करतात, परंतु सरकारी नोकरीच्या आशेने ते रोजगार केंद्रातील नोंदणी रद्द करत नाहीत, उलट ती कायम ठेवतात. त्यामुळे गोवा राज्यात बेकारीचा दर फुगल्यासारखा दिसतो, असा दावा राज्य सरकारतर्फे करण्यात येतो.

1.50 लाख कुटुंबे व 6.56 लाख व्यक्तींचे सर्वेक्षण

देशभरातील (गोव्यासह) 1.50 लाख कुटुंबे व 6.56 लाख व्यक्ती यांचे सर्वेक्षण करुन हा अहवाल तयार करण्यात आला असून त्यात प्राथमिक ते पदव्युत्तर शिक्षणाच्या स्तरापर्यंतची पात्रता विचारात घेण्यात आली होती, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. गोव्यातील विविध सरकारी नोकरभरतीसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज येतात हे सत्य असून त्यातूनही गोव्यात बेकारी जास्त असल्याचे स्पष्ट होते.

Advertisement
Tags :

.