For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिरगाव चेंगराचेंगरीतील जखमींना गोवा सरकारकडून १ लाखाची मदत

04:35 PM Jun 17, 2025 IST | अनुजा कुडतरकर
शिरगाव चेंगराचेंगरीतील जखमींना गोवा सरकारकडून १ लाखाची मदत
Advertisement

मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या हस्ते आंबडगाव येथील तिघांना धनादेश

Advertisement

दोडामार्ग – वार्ताहर

शिरगांव येथील लईराई देवीच्या जत्रेत चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या दोडामार्ग आंबडगाव येथील सुरेश शंकर गवस, गणपत गवस, शशिकांत गवस यांना गोवा सरकार कडून प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत देण्यात आली. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोदजी सावंत यांच्या हस्ते धनादेश प्रदान करण्यात आले. गोवा येथील रवींद्र भवन येथे आज मंगळवारी हे धनादेश वितरित करण्यात आले. यावेळी दोडामार्ग भाजपा तालुकाध्यक्ष दीपक गवस, कसई दोडामार्ग नगरपंचायतचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण, युवामोर्चा तालुकाध्यक्ष पराशर सावंत, खोक्रल सरपंच देवेंद्र शेटकर आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.