For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोवा सरकारला दहा कॅसिनोंकडून 352 कोटी 44 लाख येणे बाकी

12:44 PM Jul 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
गोवा सरकारला दहा कॅसिनोंकडून 352 कोटी 44 लाख येणे बाकी
Advertisement

पणजी : राज्यातील 10 कॅसिनोचालकांनी सरकारला अद्याप 352 कोटी 44 लाख रुपये देणे बाकी आहे. सरकारने त्यांना अधिकृतपणे नोटिसा बजावल्या असल्या तरी देखील या कॅसिनोचालकांनी अद्याप सरकारला पैसे भरलेले नाहीत. राज्य विधानसभेत कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी विचारलेल्या एका तारांकित प्रश्नाला उत्तर देताना गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे की, कोविड काळामध्ये कॅसिनो बंद होते. त्यामुळे त्या काळातील फी आपल्याला माफ करावी, अशी मागणी कॅसिनो चालकाने केली आहे. तथापि गोवा सरकारने त्यांच्याकडून सारे पैसे सरकारला मिळावेत यासाठी नोटिसा जारी केलेल्या आहेत. सध्या राज्यात एकूण 24 कॅसिनो चालू आहेत, पैकी 18 कॅसिनो हे जमिनीवर आहेत, तर सहा कॅसिनो हे मांडवी नदीत तरंगत आहेत. जे जमिनीवर कॅसिनो आहेत त्यापैकी नऊ कॅसिनोनी सरकारला वार्षिक फी द्यावयाची आहे. आणखी एका प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की या कॅसिनो चालकांकडून राज्य सरकारने 1661 कोटी 27 लाख रुपये एप्रिल 2021 ते 10 जुलै 2025 यादरम्यान वसूल केले आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.