For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोवा फॉरवर्ड काढणार राज्यव्यापी यात्रा

07:43 AM Aug 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
गोवा फॉरवर्ड काढणार राज्यव्यापी यात्रा
Advertisement

राज्य कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

मडगाव : गोवा फॉरवर्डने गोव्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाला स्पर्श करणारा राज्यव्यापी जनसंपर्क कार्यक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला. ही यात्रा पेडणे येथून सुरू होऊन प्रत्येक तालुक्यातून प्रवास करेल आणि दक्षिण गोव्यात तिचा समारोप होईल. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी आणि जनआंदोलन उभारण्याच्या तयारीचा एक भाग म्हणून रविवारी मडगावात पार पडलेल्या पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Advertisement

बैठकीला संबोधित करताना गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष व फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई म्हणाले की, ही यात्रा गोव्यातील समाजाच्या प्रत्येक घटकाच्या समस्या समजून घेण्यावर आणि जनहितार्थ पर्याय मांडण्यावर लक्ष केंद्रीत करेल. अनुसूचित जमाती, महिला, तऊण, शेतकरी, मच्छीमार आणि इतर घटकांवर परिणाम करणाऱ्या मुद्यांचा अभ्यास पक्षाने आधीच सुरू केला आहे. ही यात्रा या समस्या थेट लोकांपर्यंत पोहोचविण्याचे आणि संवादातून त्यावर उपाय शोधण्याचे एक व्यासपीठ ठरेल.

राज्य कार्यकारिणीच्या बैठकीचा मोठा भाग अलीकडील ‘जेन झी’ चळवळीचा उदय आणि त्यातून मिळणारे धडे समजून घेण्यावर केंद्रीत होता. सरदेसाई म्हणाले की, तीन तासांच्या चर्चेपैकी जवळपास दोन तास गोव्यातील तऊण पिढीच्या आकांक्षा आणि समस्यांवर केंद्रीत होते. प्रामुख्याने 30 वर्षांखालील तऊणांच्या नेतृत्वाखालील या चळवळीने तऊण मतदारांची वाढती राजकीय ताकद आणि प्रशासनावर प्रभाव टाकण्याची क्षमता अधोरेखित केली आहे.

आज ‘जेन झेड’चा वाटा एकूण मतदारांत जवळपास 40 ते 50 टक्के आहे आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. गोवा फॉरवर्डने या अलीकडील चळवळीच्या खूप आधीच ‘जेन झेड’ सदस्यांचा आपल्या राज्य समितीत समावेश केला होता. पक्षाने युवा प्रतिनिधीत्वाचे महत्त्व ओळखले होते आणि असे करणारा तो गोव्यातील पहिला राजकीय पक्ष ठरला होता, असे सरदेसाई यांनी निदर्शनास आणून दिले. ते म्हणाले की, पक्ष तऊणांशी संवाद साधणे, त्यांच्या समस्या समजून घेणे आणि त्यांना महत्त्वाच्या वाटणाऱ्या मुद्यांवर उपाय शोधणे यासाठी नवीन दृष्टिकोन विकसित करणे सुरूच ठेवेल. तसेच गोव्याचे भविष्य घडवताना त्यांना सोबत घेऊन चालेल. या बैठकीला पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते आणि विविध आघाड्यांचे अध्यक्ष उपस्थित होते

Advertisement
Tags :

.