महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

गोव्याला जाणाऱ्या विमानाचे बेळगावमध्ये इमर्जन्सी लँडिंग

11:01 AM May 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सर्व प्रवासी सुखरूप, रात्री उशिरा विमान पोहोचले गोव्याला

Advertisement

बेळगाव : गोव्याच्या दाभोळी विमानतळावर धावपट्टी सिग्नल न मिळाल्याने विमान थेट गोव्याहून बेळगावला इमर्जन्सी लँडिंग करण्याची घटना बुधवारी रात्री घडली. बेळगाव विमानतळावर यशस्वी लँडिंग झाल्यानंतर काहीवेळ हे विमान बेळगावमध्येच थांबविले. गोवा विमानतळावर सिग्नल व्यवस्थेतील दोष दुऊस्त झाल्यानंतर हे विमान बेळगावहून गोवा विमानतळावर यशस्वीरित्या लँडिंग झाले. प्रवासी सुखरूपपणे गोव्याला पोहोचल्याने सर्वांनी आभार मानले. लक्षद्वीप येथून निघालेले विमान बुधवारी सायंकाळी गोवा येथील दाबोळी विमानतळानजीक आले. परंतु धावपट्टीवर उतरण्यास योग्य स्थिती नसल्याने, तसेच सिग्नल वैमानिकांना उपलब्ध झाले नाहीत. बराच वेळ प्रयत्न केल्यानंतरही सिग्नल मिळत नसल्याने अखेर वैमानिकाने विमान जवळच्या बेळगाव विमानतळावर उतरण्याचा निर्णय घेतला. फ्लाय 91 या कंपनीचे विमान बुधवारी रात्री साडेआठ वाजता बेळगाव विमानतळावर दाखल झाले. इमर्जन्सी लँडिंगच्या सूचना मिळाल्याने विमानतळावर धावपळ सुरू होती. बेळगाव विमानतळाच्या धावपट्टीवर विमान उतरल्यानंतर प्रवासी आतमध्ये बसून होते. दाबोळी विमानतळावर सिग्नल मिळत असल्याची माहिती वैमानिकाला उपलब्ध झाल्यानंतर हे विमान रात्री 8:45 च्या सुमारास पुन्हा गोव्याच्या दिशेने रवाना झाले. रात्री सव्वानऊच्या सुमारास विमान गोवा विमानतळावर उतरविण्यात आले. परंतु सिग्नल न मिळाल्याने गोवा ते बेळगाव व बेळगाव ते गोवा असा उलटा प्रवास प्रवाशांना करावा लागला.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article