For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

पाच तालुक्यातील जमिनीचे दर निश्चित, महसूल खात्याकडून अधिसूचना जारी

08:51 AM Oct 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
पाच तालुक्यातील जमिनीचे दर निश्चित  महसूल खात्याकडून अधिसूचना जारी
Advertisement

पणजी: राज्य सरकारने पाच तालुक्यातील जमिनीचे वर्ष २०२६ - २७ साठीचे किमान दर निश्चित केले असून महसूल खात्याने त्याची अधिसूचना जारी केली आहे. पेडणे, बार्देश, तिसवाडी, सालसेत आणि मुरगांव या पाच तालुक्यातील जमिनींचे दर रु. १५०० ते रु. २५,००० प्रति चौरस मीटर या दरम्यान आहेत. त्याचा आदेश २८ ऑक्टोबर रोजी काढण्यात आला असून २९ ऑक्टोबरच्या अधिकृत राजपत्रात तो प्रकाशित करण्यात आला आहे. जमिनींचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

Advertisement

सेटलमेंट झोन करण्यासाठीचे हे दर आहेत आणि त्यासाठी १००० चौ. मी. मर्यादा ठेवण्यात आली आहे. भूखंडाचा प्रकार आणि त्याचा आकार याबाबत विचार करुन दर ठरविण्याची सूचना देण्यात आली आहे. जमीन जर ५०० चौ.मी. असेल तर हा दर ३० टक्क्यांनी एस-१ ते एस ४ या झोनसाठी कमी करता येणार आहे. व्यावसायिक झोनसाठी उच्चस्तरीय किंमत तर कृषी, ऑर्चर्ड, वन, उद्योग आणि इतर जमिनीच्या वर्गवारीसाठी किंमतीत सवलत देण्यात येणार आहे. इतर तालुक्यातील जमिनींच्या दराचा त्या अधिसूचनेत उल्लेख नाही. तथापि, त्यांचे दरही लवकर निश्चित होणार असून त्याची अधिसूचना लवकरच काढण्यात येणार आहे.

सरकारनेच जमिनीचे दर वाढवल्यामुळे गोव्यातील जमिनीला, भूखंडांना आता सोन्याचा भाव प्राप्त झाला आहे. महसूल हे दर जरी सरकारने खात्याने ठरविले असले तरी त्यांची खरेदी विक्री करताना जादा दराने -होते हे सत्य आहे. कागदावर हा सरकारी दर दाखवायचा आणि प्रत्यक्षात त्याच्या दुप्पट दराने विक्री तिप्पट खरेदी करायचा उद्योग चालू आहे. आता या सरकारी दरामुळे गोव्यातील सर्व ठिकाणचे दर आपोआप वाढणार असून सर्वसामान्य माणसांना ते घेणे आणखी कठीण बनणार आहे.

Advertisement

  • पणजी, बांबोळी, आसगांव, हणजूण, कांदोळी, कळंगुट येथील जमिनींचे दर रु. २५ हजार प्रति चौरस मीटर ठेवण्यात आले आहेत.
  • मडगांव व रेईश - मागूशचे २ दर रु. २० हजार प्रति चौरस मीटर करण्यात आले आहे.
  • म्हापसा आणि शिवोली येथील जमिनींचे दर रु. १८ हजार प्रति चौ. मी. करण्यात आले आहेत.
  • वास्कोतील दर रु. १५ हजार चौ. मी. निश्चित केले आहेत.
  • पेडणे तालुक्यातील मोपा, मोरजी, मांद्रे, हरमल, केरी येथील जमिनींचे दर रु. १५ हजार प्रति चौ. मी. ठेवण्यात आले आहेत.
Advertisement
Tags :

.