For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

यमकनमर्डीजवळ 28 लाखांचा गोवा बनावटीचा दारुसाठा जप्त

06:45 AM May 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
यमकनमर्डीजवळ 28 लाखांचा गोवा बनावटीचा दारुसाठा जप्त
Advertisement

महाराष्ट्रातील दोघांना अटक, 38 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील यमकनमर्डीजवळ शनिवारी सायंकाळी पोलिसांनी सुमारे 28 लाख रुपयांहून अधिक किमतीचा गोवा बनावटीचा दारुसाठा जप्त केला आहे. हा साठा गोव्याहून आंध्रप्रदेशला नेण्यात येत होता. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी शनिवारी रात्री ही माहिती दिली आहे.

Advertisement

महामार्गावर वाहनांची तपासणी करताना एमएच 46 एएफ 4138 क्रमांकाचा कंटेनर अडवून तपासणी केली असता या कंटेनरमध्ये 16,448 लिटर गोवा बनावटीची दारू आढळून आली. पोलिसांनी संतोष नारायण हलसे (वय 33) रा. आष्टा, ता. चाकूर, जि. लातूर, सदाशिव नागोबा गिरडे (वय 53) रा. केडनेसरी, ता. सांगोला, जि. सोलापूर या दोघा जणांना अटक केली आहे.

या कंटेनरमध्ये एकूण 1,950 बॉक्स दारुची वाहतूक करण्यात येत होती. केवळ दारुसाठ्याची किंमत 28 लाख 8 हजार रुपये इतकी होते. बेकायदा दारु वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला सुमारे 10 लाख रुपये किमतीचा कंटेनरही पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईत एकूण 38 लाख 8 हजार रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जिल्हा पोलीसप्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार बेकायदा दारू वाहतुकीसाठी बनावट कागदपत्रांचाही आधार घेण्यात आला आहे. कंटेनरमध्ये हार्डवेअर साहित्याची वाहतूक करण्यात येत असल्याचे दर्शविणारी कागदपत्रे ट्रकचालकाकडे होती. मात्र, प्रत्यक्षात कंटेनर उघडून पाहिले असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदा दारुसाठा आढळून आला.

Advertisement
Tags :

.