For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अटकेविरोधात गोवा काँग्रेसचे तातडीचे आंदोलन ;पणजीतील काँग्रेस हाऊससमोर रात्री 11.30 वाजता आंदोलन

11:19 PM Oct 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अटकेविरोधात गोवा काँग्रेसचे तातडीचे आंदोलन  पणजीतील काँग्रेस हाऊससमोर रात्री 11 30 वाजता आंदोलन
Advertisement

पणजी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आज, 6 ऑक्टोबर रोजी तातडीच्या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. पणजी येथील काँग्रेस हाऊससमोर रात्री 11.30 वाजता हे आंदोलन होणार आहे.

Advertisement

राहुल गांधी यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर गोवा प्रदेश काँग्रेसने या आंदोलनाचे आयोजन केले असून, या माध्यमातून काँग्रेसकडून निषेध नोंदविण्यात येणार आहे. तसेच लोकशाहीवरील कथित हल्ल्याच्या मुद्द्यावर पक्षाची भूमिका मांडण्यात येणार असल्याचे काँग्रेस कमिटीने म्हटले आहे.

या आंदोलनात गोवा प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक सहभागी होण्याची शक्यता आहे. आंदोलनादरम्यान काँग्रेसकडून राहुल गांधी यांच्या अटकेचा निषेध व्यक्त करण्यात येणार असून, लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी आवाज उठविण्यात येणार आहे.
आंदोलनाचे ठिकाण काँग्रेस हाऊससमोरील परिसर असून, रात्री 11.30 वाजता आंदोलन सुरू होणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.