For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अल्पवयीन मुलीवरील कथित अत्याचार प्रकरणाची बालहक्क आयोगाकडून स्वेच्छा दखल, एफआयआर आणि तपास अहवाल 3 दिवसांत सादर करण्याचे निर्देश

03:36 PM Nov 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
अल्पवयीन मुलीवरील कथित अत्याचार प्रकरणाची बालहक्क आयोगाकडून स्वेच्छा दखल  एफआयआर आणि तपास अहवाल 3 दिवसांत सादर करण्याचे निर्देश
Advertisement
पणजी : जुने गोवा येथील क्राईम ब्रँच कार्यालयात पोलीस निरीक्षक विकास देयकर यांनी अल्पवयीन मुलीवर कथित लैंगिक अत्याचार केल्याच्या वृत्तांची गोवा राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने स्वेच्छा दखल घेतली आहे. या प्रकरणासंदर्भातील तक्रार, प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) आणि तपासाचा अहवाल 3 दिवसांच्या आत सादर करण्याचे निर्देश आयोगाने संबंधित यंत्रणेला दिले आहेत.

माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांच्या आधारे आयोगाने ही कारवाई केली आहे. प्रकरणातील वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि तपासाची माहिती मागवण्यात आली आहे. आयोगाने संबंधित यंत्रणेला निर्धारित मुदतीत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

Advertisement

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात अल्पवयीन मुलीची ओळख आणि गोपनीयता जपणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे आयोगाने अधोरेखित केले आहे. मुलीचे नाव, छायाचित्र किंवा ओळख उघड होईल अशी कोणतीही माहिती प्रसिद्ध करू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

आयोगाच्या या स्वेच्छा दखलीमुळे कथित अत्याचार प्रकरणाच्या तपासाकडे लक्ष वेधले गेले असून, मागवलेल्या अहवालानंतर पुढील कार्यवाहीबाबत स्पष्टता येण्याची अपेक्षा आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.