Chandgad Politics : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची चंदगडला सदिच्छा भेट
फडणवीसांच्या संभाव्य दौर्यापूर्वी चंदगडमध्ये राजकीय हालचाली वाढल्या
चंदगड : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल सोमवारी चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या सावर्डे येथील निवासस्थानी सदिच्छा भेट देत चंदगड नगरपंचायत निवडणुकीच्या घडामोडींची माहिती घेतली. आगामी निवडणुकीत युती आणि भाजप उमेदवार निश्चितपणे विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आमदार शिवाजीराव पाटील यांनी इसकास्ट्रक्चर डेव्हलपमेंटवर विशेष लक्ष केंद्रित करून चंदगडचा सर्वांगीण विकास साधण्याचे काम हाती घेतले आहे. यामुळे मतदारसंघाची नवीन ओळख निर्माण होत असून रोजगाराच्या संधीही निर्माण होत आहेत, असे गौरवोद्गार सावंत यांनी काढले. यावेळी माजी मंत्री मरमू पाटील, माजी सभापती शांताराम पाटील, नामदेव पाटील, अशोक कदम, दीपक पाटील, रवी बांदिवडेकर, अंकुश गवस, श्रीशैल नागराळ आदी मान्यवर उपस्थित होते.
यानंतर प्रमोद सावंत यांनी चंदगड येथील श्री रवळनाथ देवाचे वर्शन घेऊन भाजप व युतीच्या उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान, लवकरच होणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चंदगड दौऱ्याच्या तयारीसाठीही ही बैठक झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे