For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पुढील तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता उद्यापासून यलो अलर्ट : मोसम संपुष्टात येण्यास आता दहा दिवस शिल्लक

01:46 PM Sep 20, 2026 IST | YOGESH KANGUDE
पुढील तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता उद्यापासून यलो अलर्ट   मोसम संपुष्टात येण्यास आता दहा दिवस शिल्लक
Advertisement

पणजी: पावसाळी मोसम अधिकृतरित्या संपुष्टात येण्यास आता केवळ दहा दिवस शिल्लक राहिले असून गायब झालेला पाऊस पुढील तीन दिवस जोरात कोसळण्याची शक्यता असल्याने हवामान खात्याने २१ ते २३ सप्टेंबरपर्यंत यलो अलर्ट जारी केला आहे. यंदाच्या मोसमात अद्याप ३१ टक्के तूट असून गेल्या दोन दिवसांत पावसाने किंचित हजेरी लावली. प्रत्यक्षात यादरम्यान मुसळधार पावसाची गरज होती. परंतु पाऊस पडत नसल्याने गोव्यातील अनेक भागातील भातशेती धोक्यात आली आहे. मात्र हवामान खात्याने सायंकाळी जारी केलेल्या माहितीनुसार दिनांक २१ पासून तीन दिवस राज्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Advertisement

यामुळे तीन दिवसांकरिता येलो अलर्ट जारी केला आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये जोरदार पावसाची गोव्याला गरज आहे. कारण धरणामध्ये पाण्याची आवक गेले दहा दिवस बंदच आहे. गोव्यात पाऊस कमी प्रमाणात झाल्यामुळे अनेक ठिकाणी जादा पाण्याची गरज पडत आहे. परिणामी यंदा फेब्रुवारीनंतर मर्यादित पाणीपुरवठा करावा लागणार आहे. गेल्या २४ तासात गोव्यात अनेक ठिकाणी तुरळक पाऊस पडला. एकाही केंद्रावर एक सेंटिमीटर देखील पाऊस पडलेला नाही त्याहीपेक्षा अत्यंत कमी प्रमाणात पाऊस पडलेला आहे. मात्र आज सायंकाळपर्यंत राज्यातील विविध भागात मध्यम तथा हलक्या स्वरूपात पाऊस पडेल, असा अंदाज आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश तसेच तेलंगणा आदी परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाचे ढग पसरलेले असून त्यातील काही ढग हे गोव्याच्या दिशेने पश्चिम भागाकडे सरकत आहेत. त्याचा परिणाम गोव्यावर होणार असून गोव्यात आजपासूनच पावसाला पुन्हा एकदा प्रारंभ होईल.

Advertisement
Advertisement
Tags :

.