For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते गोवा पुस्तक महोत्सव २०२६ चे ४ फेब्रुवारी रोजी भव्य उदघाटन

03:11 PM Feb 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते गोवा पुस्तक महोत्सव २०२६ चे ४ फेब्रुवारी रोजी भव्य उदघाटन
Advertisement

विविध साहित्य, कला व वैचारिक सत्रांमध्ये दिग्गजांची उपस्थिती; ५ ते ८ फेब्रुवारीपर्यंत रंगणार मनोरंजन आणि संवादाचे कार्यक्रम

Advertisement

गोवा : नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया (NBT) आणि लोकमान्य सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गोवा पुस्तक महोत्सव २०२६ चे भव्य उद्घाटन समारंभ मंगळवार, ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ४:३० वाजता बांदोडकर मैदान, कॅम्पाल, पणजी येथे पार पडणार आहे. या साहित्यिक महोत्सवाचे उद्घाटन माननीय प्रमोद सावंत, मा. मुख्यमंत्री, गोवा यांच्या शुभहस्ते होणार असून, रमेश तवडकर, मा. मंत्री (कला व संस्कृती, क्रीडा व युवक कल्याण) हे माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. सोहळ्यास मिलिंद मराठे, अध्यक्ष, नॅशनल बुक ट्रस्ट यांच्या उपस्थितीने विशेष शोभा लाभणार आहे. महोत्सव ५ फेब्रुवारीपासून विविध वैचारिक सत्रांनी गाजणार असून त्यात मनोरंजन, साहित्य आणि विचारवंत क्षेत्रातील दिग्गज सहभागी होतील. चित्रपट व अभिनय क्षेत्रातून सचिन पिळगावकर, मृणाल कुलकर्णी, अमोल पराशर आणि अविका गोर उपस्थित राहणार आहेत. विचारवंत आणि लेखकांमध्ये आचार्य प्रशांत, सदानंद मोरे, एम. जे. अकबर आणि उदय माहूरकर सहभागी होतील, तर विशेष सत्रांमध्ये अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्ला आणि ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ सुमंत बत्रा मार्गदर्शन करतील.

महोत्सवाचे वेळापत्रक

Advertisement

५ फेब्रुवारी: 'नॅशनल फर्स्ट' व 'स्क्रीन टू पेज' विषयक चर्चा

६ फेब्रुवारी: प्रेरणा व इतिहासावर आधारित सत्रे

७ फेब्रुवारी: आत्मचिंतन व 'आफ्टर मी, चॉईस' पुस्तकावर संवाद

८ फेब्रुवारी: 'द मेनी लाईव्हज ऑफ सचिन पिळगावकर' सत्रासह समारोप

वाचन संस्कृतीला चालना देणाऱ्या या महोत्सवासाठी बांदोडकर मैदानावर भव्य शामियाना उभारण्यात आला असून तयारी अंतिम टप्प्यात आहे. गोव्याच्या सांस्कृतिक जीवनाला नवी दिशा देणाऱ्या या महोत्सवात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन युवराज मलिक (संचालक, NBT) आणि किरण ठाकूर (संस्थापक, लोकमान्य सांस्कृतिक प्रतिष्ठान) यांनी केले आहे.

Advertisement
Tags :

.