For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोवा बुक फेस्टिव्हल 2026 कार्यालयाचे आज उद्घाटन

12:35 PM Jan 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
गोवा बुक फेस्टिव्हल 2026 कार्यालयाचे आज उद्घाटन
Advertisement

पणजी : फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या गोवा बूक फेस्टिव्हल 2026 च्या तयारीसाठी त्याच्या कार्यालयाचे उद्घाटन आज गुरुवार दि. 8 रोजी सायंकाळी 4 वाजता होणार आहे. शिक्षण खात्याचे सचिव प्रसाद लोलयेकर यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन होणार असून दैनिक तरुण भारतचे समूह प्रमुख तथा सल्लागार संपादक डॉ. किरण ठाकुर हे खास उपस्थित राहणार आहेत. नॅशनल बूक ट्रस्ट आणि लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑप. सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने या फेस्टीव्हलचे आयोजन 4 ते 8 फेब्रुवारी असे एकूण 5 दिवस करण्यात आले आहे. त्याची पूर्वतयारी व औपचारिक शुभारंभ म्हणून हे कार्यालय सुरू करण्यात येत आहे.

Advertisement

पणजीतील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझामधील साहित्य सेवक मंडळाच्या कार्यालयात हा कार्यालय उद्घाटन सोहळा होणार आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाशी सुसंगत असा हा उपक्रम असून सदर फेस्टीव्हल आणि कार्यालय उद्घाटनासाठी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.  नॅशनल बूक ट्रस्ट ही भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाशी संलग्न अशी स्वायत्त संस्था असून कार्यालय उद्घाटन व बूक फेस्टीव्हलचा कार्यक्रम सर्व जनतेसाठी खुला असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.