For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजपचे माजी प्रदेश उपाध्यक्ष अनिल होबळे यांचे निधन

04:38 PM Sep 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
भाजपचे माजी प्रदेश उपाध्यक्ष अनिल होबळे यांचे निधन
Advertisement

पणजी : गोवा भाजपचे ज्येष्ठ नेते तथा पक्षाचे माजी प्रदेश उपाध्यक्ष अनिल होबळे यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनाने भाजपच्या संघटनात्मक वर्तुळात शोककळा पसरली आहे.

Advertisement

अनिल होबळे यांनी गोवा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून दीर्घकाळ जबाबदारी सांभाळली होती. पक्षसंघटनेतील विविध पदांवर कार्यरत असताना त्यांनी गोव्यात भाजपच्या संघटनात्मक विस्तारासाठी योगदान दिले. तसेच त्यांनी ‘गोवा राज्य अनुसूचित जाती (एससी) आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) वित्त आणि विकास महामंडळा’चे अध्यक्षपदही भूषविले होते. या कार्यकाळात मागासवर्गीय घटकांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात त्यांनी भूमिका बजावली.

होबळे यांनी भाजपच्या तिकिटावर सांताक्रूझ विधानसभा मतदारसंघातून निवडणूकही लढवली होती. पक्षाच्या संघटनात्मक कामात सक्रिय असलेल्या होबळे यांच्या निधनाबद्दल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसह लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी दुःख व्यक्त केले असून, त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Advertisement

अनिल होबळे यांच्या पार्थिवावर शनिवार, 26 सप्टेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता मेरशी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Advertisement
Tags :

.