For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोवा, बंगाल, चंदिगड, उत्तराखंड विजयी

06:09 AM Apr 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
गोवा  बंगाल  चंदिगड  उत्तराखंड विजयी
Advertisement

राष्ट्रीय सब ज्युनियर महिला हॉकी स्पर्धा -2026

Advertisement

वृत्तसंस्था/ रांची

गुरुवारी येथे पार पडलेल्या सब-ज्युनियर महिला राष्ट्रीय हॉकी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी गोवा, बंगाल, चंदीगड आणि उत्तराखंड या संघांनी आपापल्या सामन्यांमध्ये विजय नोंदवले. डिव्हिजनच्या सी गट अ सामन्यात गोव्याने तेलंगणाचा 6-3 ने पराभव केला. डिव्हिजन बी पूलच्या सामन्यात बंगालने दादर आणि नगर हवेली व दमण आणि दीव संघाला 1-0 ने हरवले, तर डिव्हिजन ब पूलच्या सामन्यात चंदीगडने गुजरातचा 12-1 ने धुव्वा उडवला. डिव्हिजन बी पूलमधील आणखी एका सामन्यात उत्तराखंडने कर्नाटकवर 6-1 ने मात केली.

Advertisement

गोव्याकडून कर्णधार डेलिना मेंडेस (40 वी आणि 41 वी मिनिट) आणि बर्टिला केरकेट्टा (48 वी आणि 52 वी मिनिट) यांनी प्रत्येकी दोन गोल केले. तर सीमा तिर्की (तिसरे मिनिट) आणि विद्या कुमारी (16 वे मिनिट) यांनीही गोल करून संघाच्या विजयात योगदान दिले. तेलंगणा संघाकडून आनंदी महानंद (30 आणि 36वे मिनिट) आणि नव्याश्री अकुला (15 वे मिनिट) यांनी गोल केले.

बंगाल संघासाठी कर्णधार पूजा कुमारी शॉ (21 वे मिनिट) हिने दुसऱ्या क्वार्टरमध्ये निर्णायक गोल केला. महत्त्वाची कामगिरी चंदिगडकडून कर्णधार काफी (38 वे, 46 वे, 55 वे, 60 वे), अन्नू (9 वे, 30 वे), आंचल (12 वे, 14 वे), नॅन्सी कश्यप (13 वे, 18 वे), भावना (10 वे) आणि यास्मिन शर्मा (20 वे) यांनी गोल नोंदवले. गुजरातसाठी कर्णधार नियती परमार (23 वे) हिने एकमेव गोल केला.

उत्तराखंडच्या विजयात करीना (10 वे, 12 वे, 17 वे) हिने सामन्याच्या सुरुवातीलाच ‘हॅट्ट्रिक‘ नोंदवली, तर कर्णधार मीनाक्षी (7 वे), देवयानी जोशी (53 वे) आणि दिया (60 वे) यांनीही गोल करून संघाच्या विजयात योगदान दिले. कर्नाटकसाठी प्रीती नीलर•ाrने (31 वे) एकमेव गोल नोंदवला.

Advertisement
Tags :

.