गोवा विधानसभा इमारतीचा रौप्य महोत्सव; 6 ऑक्टोबरला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांच्या हस्ते उद्घाटन
04:15 PM Oct 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
पणजी | प्रतिनिधी : गोवा विधानसभा इमारतीच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त 6 ते 9 ऑक्टोबर 2026 दरम्यान विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन 6 ऑक्टोबर रोजी दुपारी 3.45 वाजता गोवा विधानसभा परिसरात होणार आहे.
Advertisement
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि गोव्याचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात गार्ड ऑफ ऑनर, वंदे मातरम् आणि राष्ट्रगीतासह पारंपरिक दीपप्रज्वलन होणार आहे.
यावेळी विधानसभा इमारतीवरील विशेष टपाल तिकीट व विशेष कव्हरचे प्रकाशन, तसेच स्मरणिका आणि कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात येणार आहे. विधानसभा अध्यक्ष डॉ. गणेश गांवकर स्वागतपर भाषण करतील. विधिमंडळ कामकाज मंत्री मॉविन गुदिन्हो आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचीही भाषणे होणार आहेत.
Advertisement
Advertisement