For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

मोले येथील अबकारी नाक्यावर एसीबीचा अचानक छापा; 10,570 रुपये जप्त

10:30 AM Oct 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
मोले येथील अबकारी नाक्यावर एसीबीचा अचानक छापा  10 570 रुपये जप्त
Advertisement
पणजी : दक्षता जागरूकता सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गोव्यातील मोले येथील अबकारी खात्याच्या नाक्यावर अचानक छापा टाकून कारवाई केली. या कारवाईदरम्यान 10 हजार 570 रुपये जप्त करण्यात आले असून, घटनास्थळी उपस्थित असलेल्या संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू आहे.

देशभरात 26 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2026 या कालावधीत ‘दक्षता जागरूकता सप्ताह’ साजरा केला जात आहे. सरकारी कार्यालयांमधील पारदर्शकता वाढवणे, भ्रष्टाचाराला आळा घालणे आणि नागरिकांमध्ये दक्षतेबाबत जागरूकता निर्माण करणे, या उद्देशाने विविध उपक्रम राबवले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून एसीबीने मोले येथील अबकारी नाक्यावर अचानक तपासणी केली.

Advertisement

एसीबीचे अधीक्षक राजन निगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. निरीक्षक सतीश गावडे यांनी आपल्या पथकासह मोले येथील अबकारी नाक्यावर धडक देत तपासणी केली. या वेळी नाक्यावर 10 हजार 570 रुपये आढळून आले. एसीबीच्या पथकाने ही रक्कम जप्त केली असून, घटनास्थळी उपस्थित असलेल्या संबंधित कर्मचाऱ्यांकडे चौकशी सुरू केली आहे.

या कारवाईमुळे अबकारी खात्याच्या नाक्यावरील कामकाज आणि आर्थिक व्यवहार तपासणीच्या कक्षेत आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या रकमेचे नेमके स्वरूप काय आहे आणि या प्रकरणात काही अनियमितता आढळते का, याबाबत एसीबीकडून तपास केला जात आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.