For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘गो डिजिट’चा आयपीओ सूचीबद्ध

07:00 AM May 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘गो डिजिट’चा आयपीओ सूचीबद्ध
Advertisement

गुंतवणूकदारांमध्ये उत्साह : विराट अनुष्कालाही मजबूत परतावा

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली  

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या गो डिजिटने 23 मे रोजी शेअर बाजारात प्रवेश केला आहे. कंपनीचे समभाग हे एनएसईवर 5.15 टक्क्यांच्या  प्रीमियमवर सूचीबद्ध झाले आहेत. 272 रुपयाच्या इश्यू प्राईसच्या विरोधात स्टॉक रु. 286 वर उघडला. दरम्यान, बीएसईवर 3.35 टक्के वाढीसह ते 281.1 रुपयांवर सूचीबद्ध झाले. लिस्टिंग झाल्यानंतर शेअरला चालना मिळाली. बीएसईवर तो 291.45 रुपयांच्या वरच्या सर्किटला पोहोचला. याचा अर्थ आयपीओ गुंतवणूकदार आता 7.15 टक्के नफ्यात आहेत. सूचीबद्ध होण्यापूर्वी, कंपनीचे समभाग अनलिस्टेड मार्केटमध्ये 25 रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेडिंग करत होते.

Advertisement

आयपीओला चांगला प्रतिसाद

गो डिजिटचा 2,614.65 कोटी रुपयांचा आयपीओ एकूण 9.60 पट ओव्हरसबक्राइब झाला. त्यात पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी राखीव असलेला हिस्सा 12.56 पट, बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा हिस्सा 7.24 पट आणि किरकोळ गुंतवणूकदारांचा वाटा 4.27 पट होता.

विराट अनुष्कालाही फायदा

विराट कोहलीने फेब्रुवारी 2020 मध्ये 2 कोटी रुपयांची गुंतवणूक करून कंपनीचे 2,66,667 इक्विटी समभाग खरेदी केले होते. त्याच वेळी, अनुष्का शर्माने 50 लाख रुपये गुंतवून कंपनीचे 66,667 इक्विटी समभाग खरेदी केले. अहवालानुसार, अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीला 2.50 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या तुलनेत 9,53,33,524 कोटी रुपयांचा परतावा मिळाला आहे. याचा अर्थ स्टार जोडप्याला त्यांच्या गुंतवणुकीवर तब्बल 271 टक्के परतावा मिळाला.

आयपीओ कधी उघडला?

गो डिजिटचा आयपीओ 15 मे ते 17 मे पर्यंत खुला होता. या आयपीओ अंतर्गत 1125 कोटी नवीन समभाग जारी करण्यात आले. याशिवाय 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले 5,47,66,392 शेअर्स ऑफर फॉर सेल विंडो अंतर्गत जारी करण्यात आले.

Advertisement
Tags :

.