For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गो डिजिट इन्शुरन्सचा आयपीओ 15 रोजी येणार

06:24 AM May 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
गो डिजिट इन्शुरन्सचा आयपीओ 15 रोजी येणार
Advertisement

17 मे पर्यंत अर्ज करण्याची गुंतवणूकदारांना संधी : विराटसह अनुष्का शर्माही गुंतवणूकदार

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

बेंगळुरू-आधारित इन्शुरटेक स्टार्ट-अप गो डिजिट जनरल इन्शुरन्सचा प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव (आयपीओ) 15 मे रोजी सबक्रिप्शनसाठी उघडला जाणार आहे. किरकोळ गुंतवणूकदार 17 मे पर्यंत या आयपीओसाठी बोली लावू शकतील.

Advertisement

अर्जात दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला या इश्यूद्वारे 2,614.65 कोटी रुपये कंपनीला उभे करायचे आहेत. यासाठी, कंपनी 1,125 कोटी किमतीचे नवीन समभाग सादर करणार आहे आणि कंपनीचे विद्यमान गुंतवणूकदार 1,489.65 कोटी किमतीचे 5.47 कोटी समभाग आयपीओद्वारे विकणार आहेत.

विराट कोहली, अनुष्का शर्मा गुंतवणूकदार

क्रिकेटपटू विराट कोहलीने 2020 मध्ये कंपनीचे 266,667 समभाग 2 कोटी रुपयांना खरेदी केले होते. त्याचवेळी पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माने प्रायव्हेट प्लेसमेंटद्वारे 50 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. आयपीओच्या माध्यमातून प्रवर्तक गो डिजिट इन्फोवर्क्स आणि इतर विद्यमान भागधारक त्यांचे स्टेक विकत आहेत. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा मात्र गुंतवणूकदार राहतील.

या आयपीओमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर यात किती गुंतवणूक करू शकता त्याबाबत पाहु.

गुंतवणूकदार किमान व कमाल किती रक्कम गुंतवू शकतात?

या आयपीओसाठी, किरकोळ गुंतवणूकदाराला किमान एक लॉट म्हणजेच 55 शेअर्ससाठी अर्ज करावा लागेल. कंपनीने आयपीओ प्राइस बँड 258-272 प्रति शेअर निश्चित केली आहे. तुम्ही 272 च्या आयपीओच्या वरच्या प्राइस बँडनुसार 1 लॉटसाठी अर्ज केल्यास, तुम्हाला 14,960 ची गुंतवणूक करावी लागेल. किरकोळ गुंतवणूकदार जास्तीत जास्त 13 लॉटसाठी म्हणजे 715 शेअर्ससाठी बोली लावू शकतात, ज्यासाठी त्यांना 194,480 रुपये गुंतवावे लागतील.

किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 10 टक्के इश्यू राखीव

गो डिजिट जनरल इन्शुरन्सने पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (क्यूआयबी) 75टक्के इश्यू राखून ठेवला आहे. याशिवाय, सुमारे 10 टक्के हिस्सा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आणि उर्वरित 15 टक्के हिस्सा गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव आहे.

Advertisement
Tags :

.