जीएमडीसी, एमओआयएलचे समभाग तेजीत
07:00 AM Nov 28, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई : दुर्मिळ खनिज निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्राने नुकतीच 7280 कोटींची योजना जाहीर केल्याने यासंबंधीत समभागांमध्ये गुरुवारी तेजी दिसून आली. सदरचे कंपन्यांचे समभाग 9 टक्क्यापर्यंत वाढलेले दिसून आले. गुजरात मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अर्थात जीएमडीसी व एमओआयएल यांचे समभाग बीएसईवर इंट्राडे दरम्यान 9 टक्क्यापर्यंत वाढलेले दिसले. जीएमडीसीचा समभाग 9 टक्के वाढीसह 575 रुपयांवर तर एमओआयएलचा समभाग 6 टक्के वाढत 347 रुपयांवर पोहचला होता.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article