For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जीमेल वापरकर्ते ईमेल अॅड्रेस बदलू शकणार

06:51 AM Apr 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
जीमेल वापरकर्ते ईमेल अॅड्रेस बदलू शकणार
Advertisement

आता गुगलने जोडले नवीन फिचर : नवीन मेल जुन्या इनबॉक्समध्ये येणार

Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

गूगलने जीमेलमध्ये एक नवीन फीचर आणले आहे. यामुळे तुम्हाला आता तुमच्या ईमेल आयडीचे युझरनेम बदलता येणार आहे. कंपनीच्या मते, हा डिजिटल ओळख अपग्रेड करण्याचा एक मार्ग आहे. सध्या हे अपडेट अमेरिकेतील वापरकर्त्यांसाठी आहे. हे अशा लोकांसाठी आहे ज्यांना त्यांचे ‘असणारे वेगळे असे’ युझरनेम बदलायचे आहे.

Advertisement

गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी एक्सवर पोस्ट केले, ‘2004 हे एक चांगले वर्ष होते, पण तुमचा जीमेल अॅड्रेस त्यातच अडकून राहण्याची गरज नाही.’ ते म्हणाले, वापरकर्त्यांना आता ‘लाजिरवाण्या’ ईमेल अॅड्रेसला चिकटून राहण्याची गरज नाही. गूगल आता ते बदलण्याची सुविधा देत आहे.

?युझरनेम बदलल्यानंतर, जुना ईमेल अॅड्रेस तसाच राहील.

?नवीन जीमेल अॅड्रेस निवडताच, तुमचा जुना ईमेल अॅड्रेस पूर्णपणे डिलीट होणार नाही.

?पर्यायी ईमेल: तुमचा जुना पत्ता ‘पर्यायी ईमेल’ बनेल.

?जुना आणि नवीन, दोन्ही पत्त्यांवरून इनबॉक्समध्ये ईमेल पाठवले जातील.

?डेटा सुरक्षित: तुमचे ईमेल, फोटो, ड्राइव्हमधील महत्त्वाच्या फाइल्स आणि मेसेजेसवर कोणताही परिणाम होणार नाही.

?लॉग-इन सुविधा: तुम्ही कोणत्याही नवीन ईमेल पत्त्याद्वारे सर्व गूगल सेवांमध्ये (उदा. मॅप्स, यूट्यूब, ड्राइव्ह) लॉग-इन करू शकाल.

बदल करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

ईमेल बदलणे सोपे आहे, परंतु गूगलने काही आवश्यक खबरदारी घेण्यास सांगितले आहे.

?अॅप सेटिंग्ज: ईमेल बदलल्यावर काही अॅप्सची महत्त्वाची सेटिंग्ज रीसेट होऊ शकतात. हे नवीन फोनमध्ये लॉग-इन करण्यासारखेच आहे.

?बॅकअप: सुरक्षिततेसाठी तुमचा अँड्रॉइड डेटा, कॉन्टॅक्ट्स आणि फोटोंचा बॅकअप नक्की घ्या.

?क्रोम सिंक: तुम्ही क्रोम ब्राउझर वापरत असल्यास, तुम्हाला सिंक सेटिंग्ज पुन्हा तपासाव्या लागतील. वापरकर्ता नाव (युझरनेम) 12 महिन्यांतून एकदा बदलता येऊ शकते.

Advertisement
Tags :

.