भारतीय अॅथलिट्सचा गौरव
वृत्तसंस्था/ मुंबई
2024 च्या अॅथलेटिक हंगामात विविध स्पर्धांमध्ये दर्जेदार कामगिरी करणाऱ्या भारताच्या अॅथलिट्सचा येथे गौरव करण्यात आला. भारतीय अॅथलेटिक क्षेत्रातील अभिनव बिंद्रा, सानिया मिर्झा, मुरलीकांत पेटकर, विजेंद्र सिंग, योगेश्वर दत्त, यशस्वी जैस्वाल, श्रेयांका पाटील, सरबजोत सिंग, लक्ष्य सेन, रॉबिन उथप्पा, अवनी लेखरा, राणी रामपाल, हरमनप्रीत सिंग, पी. आर. श्रीजेश, निरज चोप्रा आणि साक्षी मलिक यांनी दर्जेदार कामगिरी करुन भारताचे नाव आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात गाजविले. ऑलिम्पिक, पॅरा ऑलिम्पिक, आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा त्याचप्रमाणे क्रिकेट, स्क्वॅश आणि बुद्धीबळ या क्रीडा प्रकारात अलिकडच्या कालावधीत भारतीय खेळाडुंनी मारलेली भरारी कौतुकास्पद आहे.
मुंबईत आयोजिलेल्या गौरव समारंभाला अभिनव बिंद्रा, सानिया मिर्झा, पेटकर, विजेंद्र सिंग, योगेश्वर दत्त, यशस्वी जैस्वाल, श्रेयांका पाटील, सरबज्योत सिंग, लक्ष्य सेन, रॉबिन उथप्पा, अवनी लेखरा, राणी रामपाल, हरमनप्रीत सिंग त्याचप्रमाणे औद्योगिक क्षेत्रातील कार्तिक आर्यन, करण जोहर, अनन्या पांडे, अंगद बेदी, नेहा धुपिया उपस्थित होते.