महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ग्लोबल सिग्नेचरचा तिमाही तोटा 19 कोटीवर

06:48 AM Nov 11, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

रिअल इस्टेट कंपनी सिग्नेचर ग्लोबलचा चालू आर्थिक वर्ष 2023-24 च्या दुसऱ्या (जुलै-सप्टेंबर) तिमाहीत एकत्रित निव्वळ तोटा 19.92 कोटी रुपयांवर पोहचला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीचा निव्वळ तोटा 59.25 कोटी रुपये राहिला होता.

Advertisement

शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत सिग्नेचर ग्लोबलने सांगितले की, 2023-24 या आर्थिक वर्षातील जुलै-सप्टेंबर या कालावधीत एकूण उत्पन्न घटून 121.16 कोटी रुपये झाले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ते 135.68 कोटी रुपये होते.

दुसऱ्या तिमाहीत एकूण खर्च 144.84 कोटी रुपयांवर घसरला आहे, जो मागील वर्षी याच कालावधीत 223.33 कोटी रुपये होता. सिग्नेचर ग्लोबलने गुरुग्राम कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेडमधील 100 टक्के स्टेक घेण्यासाठी निश्चित करारावर स्वाक्षरी केल्याची घोषणा केली. गुरुग्राम कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेडकडे सेक्टर 71 गुरुग्राममध्ये 25.14 एकर जमीन आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article