कोल्हापूरच्या संस्कृतीची झलक असलेल्या हेरिटेज टर्मिनल! विमानतळाच्या नविन इमारतीचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
कोल्हापूर :
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने देशातील विमानतळांच्या विस्तारीकरणासाठी आणि विकासासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यातून कोल्हापूरच्या विमानतळावर विविध प्रकारच्या सोयीसुविधा निर्माण झाल्या आहेत. विमानतळाच्या विस्तारीकरणासह सुसज्ज देखणी टर्मिनल इमारत साकारली आहे. या नव्या टर्मिनल इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने आज करण्यात आले असून अत्यंत सुसज्ज आणि कोल्हापूरच्या संस्कृतीशी मिळतेच होते हे टर्मिनल साकारण्यात आले आहे.
कोल्हापूरच्या संस्कृतीला शोभेल अशा पद्धतीचे टर्मिनल:
कोल्हापूरच्या वैभवात भर घालणाऱ्या विमानतळाच्या अद्ययावत आणि नव्या टर्मिनल बिल्डिंगचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पार पडले.तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर विमानतळावर प्रत्यक्ष हजेरी लावत या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शवली. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या विशेष प्रयत्नांतून कोल्हापूर विमानतळासाठी तब्बल 272 कोटी रूपये निधी मिळाला होता यापैकी तब्बल 74 कोटी रुपयेहून अधिक निधी नवीन टर्मिनल उभारणी साठी देण्यात आले होते. तर कोल्हापूरचे हे नवीन टर्मिनल हे कोल्हापूरच्या संस्कृतीला शोभेल अशा पद्धतीचे असावे अशी सूचना हवाई मंत्र्यांकडून देण्यात आली होती त्यानुसार कोल्हापूरचा हे नवीन टर्मिनल तयार करण्यात आली असून संपूर्ण टर्मिनल ला हेरिटेज रूप देण्यात आले आहे. कोल्हापूर विमानतळाच्या या नवीन टर्मिनलचे प्रवेशद्वार जुन्या गडकिल्ल्याना ज्या प्रमाणे तोरणचे डिझाईन असलेले प्रवेशद्वार असायचे त्या पद्धतीने काळ्या रेखीव दगडांचा करण्यात आला आहे. तसेच त्यावर मशालीही लावण्यात आल्या आहेत. इमारतीमध्ये महाराणी छत्रपती ताराराणी यांचे छायाचित्र, छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्याभिषेक सोहळ्याचे चित्र, श्री करवीर निवासिनी अंबाबाई, दख्खनचा राजा ज्योतिबा यांच्यासह न्यू पॅलेस, रंकाळा, पन्हाळा, खिद्रापूर हे कोल्हापूरचे संस्कृती दर्शवणारे चित्र संपूर्ण टर्मिनल मध्ये लावण्यात आल्या आहेत.
असा आहे कोल्हापूर विमानतळाचा इतिहास:
कोल्हापूर संस्थानानच्या काळात राजर्षी शाहू महाराजांनी रेल्वे सुरू करून दळणवळण सेवा वाढविली. मात्र त्या त्यांच्यानंतर कोल्हापूर संस्थानातील आणखी व्यापारवाढीसाठी विमानतळ असावे या हेतूने छत्रपती राजाराम महाराजांनी प्रयत्न करत विमानसेवेचा पाया रचला. १९३०-३५ ला विमानतळाचे काम सुरू केले. त्यासाठी १७० एकर जमीन संपादित केली. विमानतळाचे उद्घाटन ४ मे १९४० ला छत्रपती राजाराम महाराज यांच्या हस्ते झाले. १९७८-७९ ला विमानतळाचे विस्तारीकरण झाले होते. उद्योगनगरी म्हणून ओळख असणाऱ्या कोल्हापूरला खऱ्या अर्थाने जगाच्या पटलावर नेण्याचे काम छत्रपती राजाराम महाराजांनी केले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे जिल्ह्याच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली होती. मात्र यानंतर हवाई उडान योजनेअंतर्गत कोल्हापूर विमानतळाचा विकासासाठी भरघोस निधी केंद्र सरकारकडून देण्यात आला आणि यामधून या नवीन टर्मिनल चे आज उद्घाटन करण्यात आले असून त्या संपूर्ण टर्मिनल मध्ये छत्रपती राजाराम महाराज यांचे व विमानतळ उभारण्याची माहिती देखील लावण्यात आले आहेत. तसेच सुप्रसिद्ध कोल्हापुरी चप्पल चे स्टॉल देखील विमानतळ होते लावण्यात आले आहेत.
आणखी नवीन शहरांना सेवा सुरू करणार:
या नवीन टर्मिनल मधून आणखी नवीन शहरांसोबत विमानसेवा सुरू करण्यात येणार आहेत. सध्या कोल्हापूर विमानतळावरून मुंबई, हैदराबाद, बेंगलोर या ठिकाणी सेवा पुरवण्यात येते गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई तिरुपती ही विमानसेवा काही कारणास्तव बंद झाली होती मात्र आता ही विमानसेवा पुन्हा सुरू होत असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी यावेळी दिली आहे.