For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

ग्लेन मॅक्सवेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

06:44 AM Nov 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
ग्लेन मॅक्सवेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
Advertisement

14 वर्षांच्या कारकिर्दीला पूर्णविराम; अफगाणिस्तानविरुद्धची 201 धावांची खेळी ठरली सर्वोच्च संस्मरणीय कामगिरी

Advertisement

वृत्तसंस्था, सिडनी

ऑस्ट्रेलियाचा स्फोटक अष्टपैलू क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेलने मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तब्बल 14 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीनंतर त्याने हा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयामुळे जगभरातील क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मैदानावर आक्रमक फलंदाजी, अनोखे फटके आणि चेंडूनेही प्रतिस्पर्ध्यांना अडचणीत आणण्याची क्षमता यामुळे मॅक्सवेलला ‘द बिग शो’ म्हणून ओळखले जात होते.

Advertisement

38 वषीय मॅक्सवेलने मंगळवारी 3 नोव्हेंबर रोजी ‘द फायनल वर्ड’ या क्रिकेट पॉडकास्टमधून निवृत्तीची घोषणा केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटबरोबरच व्हिक्टोरिया संघाकडून खेळल्या जाणाऱ्या 50 षटकांच्या आणि चार दिवसीय प्रथम श्रेणी क्रिकेटमधूनही त्याने माघार घेतली आहे. मात्र, फ्रँचायझी टी-20 क्रिकेटमध्ये खेळणे तो सुरू ठेवणार आहे.

286 आंतरराष्ट्रीय सामने

मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियाकडून एकूण 286 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्यामध्ये सात कसोटी, 149 एकदिवसीय आणि 130 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश आहे. त्याने सर्व प्रकारांत मिळून 7,226 धावा केल्या असून 136 बळीही मिळवले आहेत. त्याच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 3,990 धावा तर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2,897 धावा आहेत. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने पाच शतके झळकावली आहेत. भारताचा रोहित शर्मा आणि मॅक्सवेल हे पाच टी-20 आंतरराष्ट्रीय शतके करणारे प्रमुख फलंदाज ठरले आहेत.

अफगाणिस्तानविरुद्ध संस्मरणीय द्विशतक

2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानविऊद्ध खेळलेली मॅक्सवेलची खेळी क्रिकेट इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवली गेली आहे. ऑस्ट्रेलियाची अवस्था 91 धावांवर 7 बाद अशी बिकट झाली होती. अशा परिस्थितीत मॅक्सवेलने दुखापत आणि पायांत पेटके येण्याचा त्रास सहन करत 128 चेंडूंमध्ये नाबाद 201 धावा ठोकल्या. या खेळीत त्याने 21 चौकार आणि 10 षटकार लगावले. कर्णधार पॅट कमिन्ससोबत आठव्या विकेटसाठी नाबाद 202 धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला अविश्वसनीय विजय मिळवून दिला. ही खेळी त्याच्या कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय कामगिरी ठरली.

 

दुखापती आणि फिटनेसला प्राधान्य

निवृत्तीचा निर्णय घेताना मॅक्सवेलने शरीराच्या तंदुऊस्तीला अधिक वेळ देण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. आगामी काही स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्याने सांगितले. 2026 च्या टी-20 विश्वचषकात ओमानविऊद्ध खेळलेला सामना हा ऑस्ट्रेलियाकडून त्याचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला. त्या सामन्यात त्याने दोन बळी मिळवले होते.

मायदेशात निरोपाचा सामना खेळण्याची इच्छा अपूर्ण

मेलबर्न क्रिकेट मैदानावर इंग्लंडविऊद्ध होणाऱ्या आगामी टी-20 मालिकेत निरोपाचा सामना खेळण्याची मॅक्सवेलची छोटीशी इच्छा होती. मात्र, ऑस्ट्रेलियन संघ व्यवस्थापनाने युवा खेळाडूंना संधी देण्याच्या धोरणाला प्राधान्य दिल्याने त्याची ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. संघातील नव्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळणे आवश्यक असल्याचे त्याने मान्य केले.

आयपीएल आणि बिग बॅशमध्ये खेळणार

आंतरराष्ट्रीय आणि व्हिक्टोरियाकडील प्रथम श्रेणी तसेच 50 षटकांच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी मॅक्सवेल फ्रँचायझी टी-20 क्रिकेटमध्ये खेळत राहणार आहे. आगामी बिग बॅश लीगमध्ये मेलबर्न स्टार्सकडून खेळण्याची त्याची योजना आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना त्याचा आक्रमक खेळ पाहण्याची संधी मिळत राहणार आहे.

Advertisement
Tags :

.