महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

‘ग्लॅडिएटर 2’ चालू वर्षी प्रदर्शित होणार

06:16 AM Jul 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रेक्षकांची प्रतीक्षा संपुष्टात येणार

Advertisement

रिडले स्कॉटचा ‘ग्लॅडिएटल 2’ चित्रपट चालू वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 22 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यात पॉल मेस्कल मुख्य भूमिका लुसियस साकारणार आहे. लुसियस हा लुलिसा कोनी नील्सनचा पुत्र आहे. नील्सन  पल्या चित्रपटातील स्वत:ची भूमिका पुन्हा साकारणार आहे. पेड्रो पास्कल हा जनरल मार्कस एकेसियसच्या भूमिकेत दिसून येईल. जोसेफ क्विन सम्राट गेटाच्या भूमिकेत आहे. तर फ्रेड हेचिंगर हा सम्राट कैराकल्लाच्या भूमिकेत असणार आहे.

Advertisement

डेनजेल वॉशिंग्टन हा मॅक्रिनस नावाच्या एका पॉवर ब्रोकरच्या भूमिकेत असेल. लियोर रज आणि डेरेक जॅकोबी देखील यात दिसून येणार आहे. लुसियस (पॉल मेस्कल) स्वत:च्या परिवारासोबत नुमिडियात शांततेत राहत असतो, परंतु जनरल मार्कस अकासियसने शहरावर आक्रमण केल्याने लुसियसला गुलामीत रहावे लागते. याचमुळे लुसियस एक ग्लॅडिएटर होण्याचा निर्णय घेतो आणि सम्राट कॅकाकल्ला आण गेटाच्या राजवटीला आव्हान देत असल्याचे ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article