महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

झुरळांना द्या स्वत:च्या ‘एक्स’चे नाव

06:08 AM Feb 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

व्हॅलेंटाइन डे निमित्त प्राणिसंग्रहालयाची ऑफर

Advertisement

व्हॅलेंटाइन डेनिमित्त जोडपी स्वत:च्या प्रेमाला व्यक्त करत असतात. परंतु प्रेमभंग झालेल्या लोकांसाठी हा दिवस अत्यंत वेदनादायी असतो. अशा स्थितीत अमेरिकेच्या टेक्सासमधील सॅन एंटोनियो जूने एक विशेष पुढाकार सुरू केला आहे. याद्वारे जू देणगी देखील जमवत आहे. या रकमेचा वापर वन्यजीवन संरक्षणासाठी केला जाणार आहे. स्वत:च्या या पुढाकाराला प्राणिसंग्रहालयाने ‘क्राम मी अ कॉकरोच’ नाव दिले आहे.

Advertisement

यात देणगीदाखल 5-25 डॉलर्स द्यावे लागतात. कॉकरोच, उंदिर किंवा कुठल्याही भाजीला स्वत:च्या एक्सचे नाव देऊ शकतात. भाजीला स्वत:च्या एक्सचे नाव दिल्यास ती प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांना खायला दिली जाणार आहे. व्हॅलेंटाइन डेनिमित्त कॉकरोचला स्वत:च्या एक्सचे नाव द्या, या कॉकरोचला अमेरिकन प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांना खायला दिले जाईल. देणगीदाखल 5-25 डॉलर्स द्यावे लागतील, ही रक्कम परत मिळणार नाही. ही रक्कम थेट सॅन एंटोनियो जूच्या मिशनसाठी देण्यात येणार आहे. या देणगीचा वापर वन्यजीवनाच्या संरक्षणासाठी केला जाणार असल्याचे प्राणिसंग्रहालयाकडून वेबसाइटमध्ये नमूद करण्यात आले आहे.

देणगी दिल्यावर संबंधित व्यक्तीला एक डिजिटल व्हॅलेंटाइन डे कार्ड पाठविले जाते, या पुढाकारामुळे देणगीदाराला प्रेमभंगातून बाहेर पडण्यास मदत होते, तसेच त्याच्या एक्सला  एक कार्ड पाठविण्यात येते, जेणेकरून त्यांचे नाव कॉकरोचला देऊन तो प्राण्यांना खायला दिला असल्याचे कळावे. जर एखाद्या प्राण्याला मारण्याची इच्छा नसेल किंवा अन्य कुठल्याही प्राण्याचे तो भक्ष्य ठरू नये असे वाटत असेल तर त्याची नसबंदी करण्याचा पर्याय निवडता येतो.

लोकांना भाजीसाठी 5 डॉलर्स, झुरळासाठी 10 डॉलर्स तर उंदरासाठी 25 डॉलर्स खर्च करावे लागतात. 150 डॉलर्समध्ये प्राणिसंग्रहालय एक व्हिडिओ पाठवितो, ज्यात एक्सचे नाव दिलेले झुरळ, उंदिर किंवा भाजी कुठल्या प्राण्याला खायला दिली हे दाखविले जाते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#international#social media
Next Article