For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जनसेवा करण्यास संधी द्या

10:39 AM May 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
जनसेवा करण्यास संधी द्या
Advertisement

चिकोडी लोकसभा उमेदवार प्रियांका जारकीहोळी

Advertisement

बेळगाव : राज्यातील काँग्रेस सरकारकडून महिला सबलीकरणाला प्राधान्य देण्यात आले आहे. गोरगरिबांच्या कल्याणासाठी गॅरंटी योजना राबवून मदतीचा हात दिला आहे. शेतकरी, कामगार, दीन-दलितांच्या बाजूने राहणाऱ्या काँग्रेस पक्षाला समर्थन द्यावे, असे आवाहन चिकोडी लोकसभेच्या काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांनी केले. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यात येणार आहे. शिक्षण, आरोग्य, मूलभूत सुविधा पुरविण्यावर भर देऊन तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यात येतील. महिला सबलीकरणासाठी सरकारकडून अनेक योजना राबविल्या जात आहेत. त्या योजनांचा लाभ करून देऊ, असे त्यांनी सांगितले. जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी नेहमीच विकासाला प्राधान्य दिले आहे. पायाभूत सुविधा, गावांना रस्ते, पाणी, वीज, शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देऊन मतदारसंघाचा विकास साधला आहे. त्यांच्या मतदारसंघात विकासकामे राबवून जनसेवा करण्यासाठी संधी देण्याची विनंती त्यांनी केली. मतदारसंघात शेतकऱ्यांसाठी पाणीपुरवठा योजना राबवून शेतकऱ्यांचे हित साधले जाईल. जनतेने जनसेवा करण्यासाठी पाठिंबा देऊन सहकार्य करावे, अशी मागणी त्यांनी केली.

Advertisement
Advertisement
Tags :

.